Home /News /national /

लंडनच्या तरुणीने वृत्तपत्रात दिली जाहिरात म्हणाली, मीच होणार मुख्यमंत्री!

लंडनच्या तरुणीने वृत्तपत्रात दिली जाहिरात म्हणाली, मीच होणार मुख्यमंत्री!

पुष्पम प्रिया यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकलमधून झाले आहे

    पाटना, 9 मार्च :आज वृत्तपत्रामध्ये आलेली जाहिरात एका वेगळ्यात कारणाने चर्चेत आली आहे. लंडनमधील एका तरुणीने एका राजकीय पक्षाची स्थापना केली असून आपण मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. दरभंगाचे वरिष्ठ जेडीयू नेता आणि माजी एमएलसी विनोद चौधरी यांची कन्या पुष्पम प्रिया चौधरी यांनी बिहार (Bihar) विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. फक्त निवडणूक लढवणार नसून त्या मुख्यमंत्रिपदाच्या (Chief Minister) उमेदवार म्हणून समोर आल्या आहेत. आज बिहारमधील सर्वच वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर एक मोठी जाहिरात छापून आली आहे. त्यांनी बिहारच्या जनतेला संबोधित एक पत्र लिहिले आहे. हे वाचा - राणा कपूरला दुसरा झटका, ED नंतर आता CBI नेही दाखल केला गुन्हा प्लूरल्स नावाने तयार केला राजकीय पक्ष लंडनमध्ये (London) राहणारी पुष्पम प्रिया यांनी प्लूरल्स (PLURALS) नावाने आपला पक्ष तयार केला आहे. त्यांनी स्वत:ला पक्षाचा अध्यक्ष असल्याचे सांगितले आहे. पुष्पम प्रिया यांच्या ट्विटर वर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकलमधून मास्टर ऑफ पब्लिक एडमिनिस्टेशनचं शिक्षण घेतलं आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समधील आयडीएसमधून त्यांनी डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पुष्पमने जनतेला केलं आवाहन पुष्पम प्रिया चौधरी यांनी ट्विट करुन बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे की, बिहारच्या प्रगतीला वेग हवा आहे, बिहारमध्ये बदल व्हायला हवा कारण तो बिहारचा अधिकार आहे. निरर्थक राजकारणाला बरखास्त करा, बिहारला 2020 त यश मिळवून देण्यासाठी आणि उंची गाठण्यासाठी प्लूरल्स पक्षाशी जोडले जा. हे वाचा - महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याने 61 व्या वर्षी घेतला लग्न करण्याचा निर्णय सर्वांसाठी विकासाचं एकचं मॉडेल असू शकत नाही पुष्पम प्रिया चौधरी यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की एलएसई आणि आयडीएसचे शिक्षण आणि बिहारमधील माझ्या अनुभवांनी मला शिकवलं आहे की, सर्वांसाठी एकचं विकासाचं मॉडेल असू शकत नाही. पुष्पम प्रिया यांचे काका अजय चौधरी उर्फ विनयदेखील जेडीयूमध्ये आहेत आणि दरभंगा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांचे आजोबा दिवंगत उमाकांत चौधरी, नीतीश कुमार यांच्या जवळील मित्रांमधील एक राहिला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Chief Minister, Election, London

    पुढील बातम्या