राणा कपूरला दुसरा झटका, ED नंतर आता CBI नेही दाखल केला गुन्हा

राणा कपूरला दुसरा झटका, ED नंतर आता CBI नेही दाखल केला गुन्हा

राणा कपूर 11 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात राहणार आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 9 मार्च : सीबीआयने (CBI) येस बँकेचे (Yes Bank) सहसंस्थापक राणा कपूर (Rana Kapoor), दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) आणि डीओआयटी अर्बन वेंचर्स कंपनी  (Doit Urban Ventures Company) यांच्या विरोधात कट रचणे, फसवणूक, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एफआयआर (FIR) दाखल केला आहे, अधिकाऱ्यांनी यासंदर्भात रविवारी माहिती दिली आहे.

लवकरच मुंबईत छापे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एजंसीमार्फत लवकरच मुंबईत छापे मारले जाऊ शकतात. डीएचएफएल कंपनीला जेव्हा येस बँकेने 3000 कोटी रुपयांचे कर्ज दिले तेव्हा राणा यांच्या कुटुंबाशी जोडलेल्या डीओआईटी अर्बन वेंचर्स कंपनीला कथित स्वरुपात 600 कोटी रुपये मिळाले.

संबंधित - येस बँक घोटाळा : पैसे काढण्यासाठी देवालाही उभं केलं रांगेत; अभिनेता चिंतेत

मुंबईच्या विशेष हॉलिडे कोर्टाने येस बँकेचे (Yes Bank) सहसंस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत प्रवर्तन संचालनालयाकडे (ईडी) कोठडी सुनावली आहे. ईडीने रविवारी पहाटे राणा कपूरला अटक केली. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली आणि आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शनिवारी ईडीने राणा कपूर यांची वरीळीतील समुद्रमहाल निवासस्थानी चौकशी सुरू होती. येस बँकेच्या प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे.

संबंधित - येस बॅंक घोटाळा : राणा कपूर आणि प्रियंका गांधींचं कनेक्शन असल्याची शक्यता

भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या डीएचएफएलने बँकेने दिलेल्या 4,450 कोटी रुपयांसाठी कंपनीला पैसे दिले, ज्याची चौकशी सुरू होती. ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येस बँकेनं डीएचएफएलला 3,750 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 750 कोटींचे कर्ज दिलं आहे. शुक्रवारी बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापे मारण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले होते. ईडीने राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले. डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.

First published: March 9, 2020, 8:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading