Home /News /national /

कोरोनाची दहशत! रिपोर्ट येण्याआधीच धक्क्याने झाला तरुणाचा मृत्यू

कोरोनाची दहशत! रिपोर्ट येण्याआधीच धक्क्याने झाला तरुणाचा मृत्यू

या तरुणाचा मृत्यू कोरोनामुळे झाला का? हे रिपोर्ट आल्यानंतरच कळू शकणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्याची प्रतीक्षा आहे.

    कोलकाता, 09 मार्च : कोरोना व्हायरसनं भारतात शिरकाव केला असून आतापर्यंत रुग्णाची संख्या 39वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मधुमेह असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. त्याचं कारण म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाला की नाही याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही परंतु सौदी अरेबीयातून हा तरुण भारतात आल्यानंतर त्याला कोरोना व्हायरसची लक्षण दिसत होती. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तरुणाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र रिपोर्ट येण्याआधीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे तर या तरुणाचा मृत्यू झाला नाही ना? अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र रिपोर्टनंतर याबाबत नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकेल. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला तेव्हा त्या सर्दी-खोकला आणि ताप होता. कोरोना व्हायरस आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याचा काही टेस्ट केल्या मात्र त्याचे रिपोर्ट येण्याआधीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाची लागण आणि संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं लक्षात घेऊन केंद्र सरकारनं अलर्ट जारी केला आहे. हे वाचा-केरळात पुन्हा आला महाभयंकर 'कोरोना', एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण केंद्र सरकारकडून कोरोना व्हायरस संक्रमित होऊ नये यासाठी आवश्यक ती कशी काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली जात आहे. इतकच नाही तर सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे. हेल्थ सर्व्हिस डायरेक्टर अजय चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार डायबेटीसमुळेही या तरुणाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. हा तरुण इन्सुलिनवर होता. त्यांच्याकडे इन्सुलिनसाठी पैसे नसल्यानं ते खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळेही मृत्यू झाला असू शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथे घडली आहे. इथल्या रुग्णालयातील डॉक्टरांना आता मृत तरुणाच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे कोरोनाबाबत सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वाचा-असा दिसतो कोरोनाव्हायरस! चीनच्या शास्त्रज्ञांनी शेअर केला पहिला फोटो
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Bengal, Corona virus, Corona virus in india

    पुढील बातम्या