‘चांदमियां पाटीलांच्या छातीत ‘राम’ नाही तर काळे कुट्ट विष ठासून भरलेय’

‘चांदमियां पाटीलांच्या छातीत ‘राम’ नाही तर काळे कुट्ट विष ठासून भरलेय’

चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत!

  • Share this:

मुंबई 09 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी आम्हाला काही प्रदर्शन करण्याची गरज नाही. आमची छाती फाडली तर त्यात रामच दिसेल असं ते म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेने पलटवार केलाय. ‘सामना’च्या अग्रलेखातून पाटील यांचा ठाकरे शैलीत समाचार घेण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीआधी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला तेव्हा यांना काहीच अडचण नव्हती. आता मात्र त्यांच्या पोटात दुखत आहे. हिंदुंत्वाच्या नावाचं विष यांच्या छातीत असल्याचं दिसून आलं आहे अशी टीका सामनातून करण्यात आलीय. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल अशीही टीका करण्यात आलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या यात्रा यथासांग पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरू केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येस गेले, ते तिथे प्रथम गेले काय? राज्यात फडणवीसांचे व केंद्रात मोदींचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले, दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते.

आणखी काय आहे 'सामना'त

आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते अयोध्येस गेले. तिथे सरकारी मानवंदना स्वीकारली. म्हणजे त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व हजारो शिवसैनिकांसह रामलल्लांचे दर्शन घेतले. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. अशी टीका करण्यात आलीय.

राणा कपूरला दुसरा झटका, ED नंतर आता CBI नेही दाखल केला गुन्हा

उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत, काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहेत. दिल्लीप्रमाणे नागरिकता कायद्यावर महाराष्ट्रात हिंसा व्हावी असे राज्यातील ठाकरे विरोधकांना वाटत होते, पण उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या पोटदुखीवर असा इलाज केला की, राज्यात साधी ठिणगीही पडू दिली नाही. ही सर्व वाडवडिलांची पुण्याई, छत्रपतींचे आशीर्वाद आणि श्रीरामाचा प्रसाद आहे.

त्याच भावनेतून मुख्यमंत्री ठाकरे हे अयोध्येत जाऊन श्रीरामचरणी नतमस्तक झाले. मुख्यमंत्री तिथे गेले व दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशात हात घातला व राममंदिरासाठी एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण कार्य सुरू होईल व पहिला धनादेश ‘ठाकरे सरकार’ने दिला याची इतिहासात नोंद राहील. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यात राज्यातील विरोधकांच्या पोटात कळा याव्यात असे काय आहे? हे ऐकून त्यांनी खूश व्हायला हवे होते. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी.

होळीमध्ये पिण्यासाठी मजेदार वाटणारी थंडाई, आरोग्यासाठी आहे गुणकारी

हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. या विषात राम कसा नांदेल? हा साधा प्रश्न आहे. चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत! ‘‘शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही.’’ या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळय़ांचेच दात घशात घातले.

First published: March 9, 2020, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading