खासगी वाहतूकदार, स्कूलबसेस देशव्यापी संपावर, संपाची झळ विद्यार्थ्यांना

खासगी वाहतूकदार, स्कूलबसेस देशव्यापी संपावर, संपाची झळ विद्यार्थ्यांना

देशभरातील तीन हजारांहून अधिक संघटना यात सहभागी झाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं होणारी दरवाढ त्याचबरोबर टोलसह विविध मागण्यांसाठी मालवाहतूकदारांनी आजपासून देशव्यापी संप पुकारलं आहे. देशभरातील तीन हजारांहून अधिक संघटना यात सहभागी झाल्या आहेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेनं जाहीर केल्याप्रमाणे आजपासून संपाची झळ सुरू झाली आहे. या आंदोलनातट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसाईक सहभागी झाले आहेत.

दरम्यान या संपाचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतूकीवरील परिणाम टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनातून माल वाहतूक करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिलीय. या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. संप संपेपर्यंत ही अधिसूचना कायम राहणार आहे.

लोकसभेतली अविश्वास ठरावाची लढाई कोण जिंकणार? 11 वाजता मतदानाला सुरूवात

वाहतूकदारांच्या आजच्या एकदिवसीय लाक्षणिक संपात स्कूल बसचालकांचाही सहभाग असणार आहे. स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशननं या संपाला पाठिंबा दिलाय. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बस, खासगी कॅब, ट्रक, टेम्पो आदी सहभागी होतील. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस सुरू ठेवाव्यात, असं असोसिएशननं म्हटलंय. त्यामुळे काल कुठे महाराष्ट्रभर गाजलेला दुध संप मागे घेण्यात आला आणि आजपासून पुन्हा या नव्या संपाला सुरूवात झाली आहे. पण या सगळ्यात सर्वसामान्यांचं मोठे हाल होणार आहेत.

हेही वाचा...

VIDEO : बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकार अपयशी, रामदेव बाबांचा घरचा अहेर

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा डाव

आरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या

First published: July 20, 2018, 8:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading