#school bus

Showing of 1 - 14 from 32 results
धक्कादायक VIDEO!! मुंबईत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; स्कूल बसमध्ये गिअरच्या जागी वापरला बांबू

व्हिडिओFeb 7, 2019

धक्कादायक VIDEO!! मुंबईत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; स्कूल बसमध्ये गिअरच्या जागी वापरला बांबू

मुंबई, 7 फेब्रुवारी : मुंबईत विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतल्या खार इथल्या नामांकित 'पोदार इंटरनॅशनल स्कूल'च्या बसमध्ये चक्क गिअर ऐवजी बांबूचा वापर करण्यात आला होता. हा बांबू निघाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि स्कूल बस बीएमडब्ल्यू गाडीला आदळून अपघात झाला. याप्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर स्कूल बस चालकाला अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे गिअर स्टिक बिघडल्यानं तीन दिवस बांबूचा वापर करून बस चालवण्यात येत होती.

Live TV

News18 Lokmat
close