नवी दिल्ली,ता.19 जुलै : टीडीपीने आणलेला अविश्वास प्रस्तावाला लोकसभेच्या अध्यक्षांनी तातडीने दिलेल्या मंजूरीमुळे विरोधीपक्ष बुचकळ्यात पडले आहेत. सरकार एवढ्या लवकर या प्रस्तावावर चर्चा करेल ही अपेक्षा विरोधी पक्षांना नव्हती. बुधवारी सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आल्यानंतर सरकार विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलं. आणि त्यानंतर दोन तासांच्या आत लोकसभेच्या अध्यक्षांनी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेला मंजुरी दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या वेळी टीडीपीच्या खासदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली मात्र त्याला यश आलं नाही. अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेने घेतला हा मोठा निर्णय आयकर विभागाच्या छाप्यात हाती लागलं 100 किलो सोनं, समोर आले PHOTOS सरकारविरूद्ध नाराजी असली तरी विरोधी पक्षांकडे सध्या कुठलाही मोठा मुद्दा किंवा प्रकरण नाही. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव नेमका कशासाठी हा मुद्दा उपस्थित करून भाजप गेल्या चार वर्षातल्या कामाचा पाठा जनतेसमोर मांडण्याची ही संधी घेणार आहे. त्याचबरोबर विरोधीपक्षांमध्ये मतभेद असून ते मतभेदही जनतेसमोर आणण्याची भाजपची योजना आहे.
सिंचन घोटाळा तपासात दिरंगाई का? हायकोर्टाने सरकारला फटकारले
अशी राहणार नवी शंभराची नोट
ही सर्व चर्चा नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी असा करण्याचा भाजपचा विचार आहे. विरोधीपक्ष महाआघाडीच्या तयारीची बांधणी करत असतानाच अनेकांनी पंतप्रधानपदावर आपला दावा सांगितला तर शरद पवारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर अविश्वास. हे सर्व मुद्दे घेऊन विरोधीपक्षांना आरसा दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तर सत्ताधाऱ्यांची लक्तर वेशीवर टांगता येतील असं काँग्रेसला वाटतं त्यामुळे शुक्रवारी होणारी चर्चा वादळी होण्याची शक्यता आहे.

)







