दिल्ली, ता. 19 जुलै : भारतीय रिजर्व बँकेने नोटबंदीनंतर चलनात आलेली नवी शंभराची नोट बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आरबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर अधिक माहिती जारी केली आहे. दोन हजार, पाचशे, दोनशे, पन्नस आणि दहा रुपयाच्या नोटेनंतर आता रिजर्व बँकेने शंभराची नवी नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतलाय. नवी शंभराची नोट ही फिक्कट जांभळ्या रंगाची राहणार असून, त्यावर गुजरातमधील ‘रानी की बाव’ या ऐतिहासिक स्थळाची झलक पहावयास मिळेल. नव्या नोटांसोबत शंभराच्या जुन्या नोटासुद्धा चलनात राहणार असल्याचे रिजर्व बँकेने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. मैसुरच्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये दोन हजाराच्या नोटांची छपाई झाली होती, त्याच प्रेसमध्ये या शंभरीला अंतिम स्वरुप देण्यात आलं असून, ती 10 रुपयाच्या नोटेपेक्षा थोडी मोठी राहणार असल्याचे एएनआयने स्पष्ट केलयं. ईव्हीएमच्या जोरावर भाजप निवडणुका जिंकतं, राज ठाकरेंचा आरोप खास वैशिष्ट्य.. चलनात येत असलेल्या नव्या नोटेचं खास वैशिष्ठ्य असं की, हुशंगाबाद येथील पेपर मीलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या कागदावरच नव्या शंभराच्या नोटा छापण्यात येत आहेत. नोटबंदीनंतर सुरू झालेत बदल.. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वप्रथम दोन हजाराच्या आणि पाचशेच्या नव्या नोटा चलनात आल्या. नोटबंदीनंतर आरबीआयने सर्वप्रथम ऑगस्ट 2017 मध्ये शंभराची नवी नोट चलनात आणली होती, आता नव्याने चलनात येणारी शंभरीसुद्धा त्यात भर घालणार आहे. सिंचन घोटाळा तपासात दिरंगाई का? हायकोर्टाने सरकारला फटकारले आयकर विभागाच्या छाप्यात हाती लागलं 100 किलो सोनं, समोर आले PHOTOS
धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क
RBI to Issue New Design ₹ 100 Denomination Banknotehttps://t.co/vn5M8BPtEF
— ReserveBankOfIndia (@RBI) July 19, 2018