मराठी बातम्या /बातम्या /देश /

शिवसेना कुणाची? दिल्लीत ठाकरे गटाकडून हालचालींना वेग, आजच 'गेम' होणार!

शिवसेना कुणाची? दिल्लीत ठाकरे गटाकडून हालचालींना वेग, आजच 'गेम' होणार!


शिवसेना आणि शिंदे गटाला 23 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाला 23 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाला 23 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : मागील 3 महिन्यांपासून शिवसेना नेमकी कुणाची? या प्रश्नाभोवती राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर केली जाणार आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाला 23 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटाला कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहे. आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्र आणि जवळपास 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. आजच ठाकरे गट निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर करणार आहे.

संजय राऊत पोहोचले दिल्लीत

दरम्पयान, त्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे दिल्लीत पोहोचले.   'मी दिल्लीत कामासाठी आलो आहे. पक्षाच्या कामासाठी आलो आहे. सुटका ही सुटका असते, जामिनावर सुटका शब्द वापरणे बरोबर नाही, मी माझ्या कामाला लागलो आहे. पक्षाचे काम, राज्याचे काम आणि संसदेचे काम आहे. अन्यायविरोधात लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. सगळेच काही पळकुटे नसतात. काही लढणार असतात. महाराष्ट्र हा टिकून राहिला आहे. शिवसेनेची मशाल कायम पेटत राहणारी आहे' असं यावेळी संजय  राऊत म्हणाले.

(नारायण राणे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब, तर सोमय्यांवरही सुषमा अंधारेंचा प्रहार)

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये काय आहे वाद?

विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड केलं. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं, त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतलं हे बंड आमदारांपर्यंतच थांबलं नाही तर 18 पैकी 13 खासदारांनीही शिंदेंना साथ दिली, याचसोबत शिवसेनेचे पदाधिकारीही शिंदे गटात दाखल झाले.

लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा ठोकला. हा वाद सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घ्यायला सांगितला.

(वंचित आघाडीसोबत युती होणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...)

शिवसेना कुणाची हा वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लागली, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.

दोन्ही गटांकडून कागदपत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगात या कागदपत्रांची छाननी केली जाईल, त्यानंतर निवडणूक आयोग गरज पडली तर संबंधित व्यक्तींना बोलवूनही घेऊ शकते. राज्यातल्या महापालिका निवडणुका पेंडिंग आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाने निकाल दिला नाही तर या निवडणुका दोन्ही पक्षांना मशाल आणि ढाल-तलवार यावर लढवाव्या लागू शकतात.

बिहारमध्येही एलजेपीवरून चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्यात वाद झाला. हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला, पण वर्षभरापेक्षा जास्तचा काळ झाला तरीही याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यावेळीही निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली.

First published: