मराठी बातम्या /बातम्या /देश /

वंचित आघाडीसोबत युती होणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...

वंचित आघाडीसोबत युती होणार का? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले...

 हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे.

हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे.

हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. प्रकाश आंबेडकर जर एकत्र आले तर देशासाठी एक चांगला फॉर्म्युला आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वंचित आघाडीसोबत युतीबद्दल स्पष्ट संकेत दिले.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत हे दिल्लीत पोहोचले. यावेळी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी वंचित आघाडीबद्दल खुलासा केला.

'रावसाहेब दानवे यांनीच मध्यावधीची निवडणुकीचे संकेत दिले आहे. दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात. दोन महिन्यात मध्यावधी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याबद्दल माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, आणि त्याची खात्री आहे, असंही राऊत म्हणाले.

(गिरीश महाजनांच्या मनात चांगल्या भावना नसतात, त्यांच्या नजरा वेगळ्या; एकनाथ खडसेंची पुन्हा टीका)

हा विषय फक्त मुंबई महापालिकेसाठी मर्यादीत नाही तर राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. प्रकाश आंबेडकर जर एकत्र आले तर देशासाठी एक चांगला फॉर्म्युला आहे. आंबेडकर जर देशातील या हुकुमशाहीविरोधात उभे राहिले तर देशाला चांगली दिशा मिळू शकते. त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडत आहे, असंही राऊत म्हणाले.

(pm modi : 2 दिवसांपासून मोदींना ठार मारण्याच्या धमक्या, पाठवल्या 19 ऑडिओ क्लिप आणि 20 मेसेज)

महाराष्ट्र आणि बेळगाव सीमेबाबत दोन मंत्र्यांची नियुक्ती झाली आहे. याआधी अनेक मंत्र्यांच्या नियुक्ता झाल्या आहे. युती सरकारच्या काळात दोन वेळी चंद्रकांत पाटील मंत्री होते. त्यांच्यावर खास जबाबदारी होती. आताही पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. नियुक्ती केलेले मंत्री किती वेळा बेळगावात गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बेळगावात गेलं पाहिजे. ते आतापर्यंत का पोहोचले नाही. आता मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय दिवे लावणार आहात, तुम्ही बेळगावला जायला हवं. तिथे मराठी मुलांवर खोटे खटले दाखल केले आहे. ते तिथल्या मुख्यमंत्र्यांना हिंमतीने सांगा, असं आव्हानही राऊत यांनी शिंदेंना दिलं.

आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे त्यांचा बचाव करत आहे. हे काय बेळगावमधील तरुणाचा बचाव करणार आहे. 1 नोव्हेंबरला शिवसेनेचे नेते बेळगावामध्ये गेले. पण, शिंदे सरकारचा एक मंत्री तिथे गेला नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.

'मुख्यमंत्री म्हणून जर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगाव प्रश्न भेट घेणार असेल तर त्या भेटीचा रेकॉर्डिंग करून साक्षीदारासह सार्वजनिक करावं अशी मागणी आमची राहणार आहे, अशी मागणीही राऊत यांनी केली.

First published:

Tags: Marathi news