नवी दिल्ली, 15 मे : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus)देशभरात लॉकडाऊन असताना काही बंधन शिथिल करण्यात आली आहेत. त्यामध्ये दारूची दुकानं उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा झाली. ही दुकानं बंद करावी या मागणीसाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. पण कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. एवढंच नाही, तर याचिकाकर्त्यांनाच 1 लाख रुपयांचा दंड भरायला सांगितला आहे. वास्तविक गृहमंत्रालयाने असे स्पष्ट निर्देश दिले होते की, जिथे कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे, जो भाग प्रतिबंधित क्षेत्र (Coantainment Zone)आहे तिथे दारूविक्री होणार नाही. अशा भागांमध्ये कुठल्याच प्रकारच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तू वगळता रेड झोनमध्ये इतर सर्व दुकानं अद्याप बंद असताना दारूच्या दुकानांना अनुमती देण्याच्या सरकारच्या या निर्णयाला दोन याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सरकारच्या या अनुमती निर्णयावर आक्षेप घेण्यासारखं काही नाही, असं सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. अकारण न्यायालयाचा वेळ घेतल्याबद्दल 1 लाखाचा दंडही लावण्यात आला. याचिकाकर्त्यांनी निव्वळ प्रसिद्धीसाठी या याचिका दाखल केल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आणि म्हणूनच त्यांना दंड लावण्यात आला. एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखूनच दारूची दुकानं उघडी ठेवण्याचा आदेश होता. सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं नाही, तर दुकानं बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. दारूच्या दुकानात बसून दारू प्यायला मात्र मनाई करण्यात आली आहे. दुकानात एका वेळी पाचपेक्षा अधिक जण नसावेत आणि दारूसाठी रांग करून एकमेकांपासून किमान 2 मीटरचं अंतर राखलं पाहिजे, असेही नियम आहेत. कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळं होणार 12 लाख लहान मुलांचा मृत्यू, UNICEFचा खुलासा 35 दिवसांच्या चिमुरड्यानं कोरोनाला हरवलं, एका दिवसात 51 रुग्ण झाले ठणठणीत लॉकडाऊनचा मोठा झटका!3 मिनिटांच्या व्हिडीओ कॉलमध्ये गेली 3700 कर्मचाऱ्यांची नोकरी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.