जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लॉकडाऊनचा मोठा झटका! 3 मिनिटाचा व्हिडीओ कॉल अन् एका क्षणात गेली 3700 कर्मचाऱ्यांची नोकरी

लॉकडाऊनचा मोठा झटका! 3 मिनिटाचा व्हिडीओ कॉल अन् एका क्षणात गेली 3700 कर्मचाऱ्यांची नोकरी

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

भारतासह जगभरातील काही देशांमध्ये टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या Uber ने त्यांच्या 14 टक्के म्हणजे 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 मे : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार माजला आहे. जगभरात कोरोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे, उलट हा धोका वाढत चालला आहे. परिणामी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) जागतिक स्तरावर अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या खर्चात कपात करत आहेत. त्याकरता विविध कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात सुरू केली आहे तर काही कंपन्यांनी नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये आता ऑनलाइन टॅक्सी सेवा देणाऱ्या UBER चा देखील समावेश झाला आहे. UBER ने त्यांच्या 14 टक्के म्हणजे एकूण 3700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. (हे वाचा- बंद पडलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात ) उबरने त्यांच्या कर्मचाऱ्यांना केवळ 3 मिनिटांच्या व्हिडीओ कॉलवर ही माहिती दिली. त्यांच्या कर्मचाऱ्यांना झूम व्हिडीओ कॉल (Zoom Video Call) करून अशी माहिती दिली की, कोव्हिड-19 पँडेमिक (COVID-19 Pandemic) एक मोठी समस्या बनला आहे. त्यामुळे उबरकडून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. उबरने सांगितलं की, आम्ही 3500 फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहोत. ‘तुमचं काम प्रभावित झाल्यामुळे आज तुमचा उबरबरोबर काम करण्याचा शेवटचा दिवस आहे’, असं या कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीने आधी नोटीस देणं आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अचानक 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे (हे वाचा- पोस्टाची ही योजना तुम्हाला बनवेल करोडपती, दर महिन्याला करावी लागेल इतकी गुंतवणूक ) मिळालेल्या माहितीनुसार काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना काही रक्कम देण्यात आली आहे. उबरचे चालू आर्थिक वर्षात 2.9 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. कंपनीने त्यांच्या बाइक आणि स्कूटरचा व्यवसाय देखील बंद केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात