कोरोना नाही तर 'या' कारणामुळं होणार 12 लाख लहान मुलांचा मृत्यू, UNICEFचा धक्कादायक खुलासा

कोरोना नाही तर 'या' कारणामुळं होणार 12 लाख लहान मुलांचा मृत्यू, UNICEFचा धक्कादायक खुलासा

येत्या 6 महिन्यात 12 लाख लहान मुलांचा मृत्यू होईल अशा इशारा UNICEFने दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : साऱ्या जगावर सध्या कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) संकट आहे. जगभरातील 190 देश या रोगाशी दोनहात करत आहेत. यातच आता युनायटेड नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय बाल आपातकालीन निधी (UNICEF) या संस्थेनं असा इशारा दिला आहे की, येत्या 6 महिन्यात जगभरातील तब्बल 12 बालकांचा मृत्यू कोव्हिड-19 मुळे होऊ शकतो. UNICEFच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर तर केला आहे, मात्र यामुळं आरोग्य सेवा मिळत नाही आहेत. याच कारणामुळं 6 महिन्यात दररोज 6000 नवजात बालकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता UNICEFनं वर्तवली आहे.

UNICEFनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, या मुलांचा मृत्यू हा कोरोनामुळं नाही तर आरोग्या सेवेच्या अभावामुळं होणाऱ्या इतर आजारांमुळे होऊ शकतो. UNICEFच्या मते लहान मुलांच्या मृतांचा आकडा हा कोरोनाला बळी पडलेल्या रुग्णांच्या आकड्यापेक्षा वेगळा असेल.

आरोग्य सेवांचा अभाव ठरणार बालमृत्यूचे कारण

UNICEFनं असा अंदाज व्यक्त केला आहे की, 118 कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील माता आणि बाल मृत्युदरांवर कोरोनाचा अप्रत्यक्ष परिणाम होईल. या संस्थेच्या म्हणण्यानुसार, या अभ्यासामध्ये सामील झालेल्या 118 देशांमध्ये मरण पावलेल्या 25 लाख मुलांपैकी अधिक हे 5 वर्षाखालील होते. तर, 12 लाख मुलांचा हा मृत्यू हे जन्मानंतर सहा महिन्यांनी झाला. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं एक जर्नल प्रकाशित केले आहे. यात मुलांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोनामुळे आरोग्य सेवांमध्ये 15 टक्के कपात झाल्यास 5 वर्षांखालील बालमृत्यू दर 9.8 टक्क्यांनी वाढू शकेल, म्हणजेच दररोज 1,400 आणि दरमहा 8.3 टक्के मातांचा मृत्यू होईल. तसेच, जर आरोग्य सेवांमध्ये 45 टक्के कपात झाल्यास, दरमहा मुलांच्या मृत्यूचे प्रमाण 44.7 टक्क्यांनी आणि माता मृत्यूंमध्ये 38.6 टक्क्यांनी वाढू शकते.

वाचा-35 दिवसांच्या चिमुरड्यानं कोरोनाला हरवलं, एका दिवसात 51 रुग्ण झाले ठणठणीत

दुसऱ्या महायुद्धानंतरचे मोठे संकट

या अभ्यासात सामील असलेल्या तज्ज्ञांच्या मते, हा अंदाज तात्पुरता आहे. जर आरोग्या सेवांचा अभाव रोज वाढला, लोकांना वेळेवर अन्न मिळालं नाही ही परिस्थिती आणखी वाईट होईल. UNICEF यूकेचे कार्यकारी संचालक एस. देशमुख म्हणाले की, या जागतिक संकटात प्रत्येक वयोगटातील लोकांवर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. त्याच वेळी, मुलांसाठी हे संकट दुसरे महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आणि धोकादायक जागतिक संकट आहे. साथीच्या रोगांमुळे आरोग्य यंत्रणा कमकुवत झाली. परिणामी लोकांना अन्नही मिळत नाही आहे. त्यामुळं उपासमारीनं जास्त मृत्यू होतील.

वाचा-कोरोनाच्या संकटात चिमुरड्यांसाठी धावून आला देवदूत, तब्बल 200 मुलांचा वाचवला जीव

या 10 देशांवर येणार संकट

UNICEFच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक मृत्यू झालेल्या अंदाजे 10 देशांमध्ये भारतही आहे. त्यापैकी सर्वात जास्त मृत्यू बांगलादेश, ब्राझील, कांगो, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, युगांडा आणि टांझानिया आहेत. कोरोनामुळे कोट्यवधी मुलांना गोवर, डिप्थीरिया आणि पोलिओसारख्या आजारांवरही लस मिळत नाही आहे. त्यामुळं कोरोनापेक्षा जास्त लहान मुलांना या आजारांचा धोका आहे. जगभरात कोट्यवधी मुलांना गोवर, डिप्थीरिया आणि पोलिओसारख्या आजारांवर लस मिळत नाही, मात्र हा आकडा येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. UNICEFने या पीडित मुलांना मदत करण्यासाठी 1.6 अब्ज डॉलर्सची मदत मागितली आहे.

वाचा-वाटेतच बाप गमावला, मुंबईतून कोकणात निघालेल्या मुलांच्या डोळ्यासमोरच छत्र हरपलं!

First published: May 15, 2020, 3:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading