कल्याण, 15 मे: कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण झपाट्यानं वाढत आहे. एका दिवसांत 51 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात 35 दिवसांच्या चिमुरडा, 2 महिन्यांचं बाळ आणि 8 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. गुरुवारी संध्याकाळी सगळ्यांनी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. हेही वाचा.. BREAKING: नवी मुंबईत APMC मार्केटमधील 2 व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने कोव्हिड 19 साठी सामंजस्याचा करार केलेल्या होली क्रॉस रुग्णालयातून 5, आर आर हॉस्पिटलमधून 8 आणि टाटा आमंत्रा येथून 27 तर 11 अशा 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजे एकाच दिवसात 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण 391 रुग्णापैकी एकूण 181 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत . कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. एकट्या मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 19 हजार 579 आहे. तर 621 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 27 हजारहून अधिक आहे. गेल्या 24 तासांत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1019 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. हेही वाचा… सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरात घुसला कोरोना, केलं सेल्फ क्वारंटाइन APMC मार्केटमधील 2 व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार झपाट्यानं होत आहे. देशातील कोरोनामुळं सगळ्यात जास्त प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 998 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडली आहेत. तर, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेतील (Agricultural Produce Market Committee) दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एपीएमसीमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दोन्ही कांदा-बटाटा व्यापारी होती. दोघांवरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आतापर्यंत मार्केटमध्ये एकूण 117 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 55 रुग्ण एपीएमसीमध्ये काम करणारे आहेत. त्यात व्यापारी, कर्मचारी आणि मजुरांचा समावेश आहे. तर 62 जण एपीएमसी मार्केटशी संबंधित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.