Home /News /national /

शिवसेना सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर करणार? भाजपच्या मोर्चाला भाड्याने माणसं? TOP बातम्या

शिवसेना सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर करणार? भाजपच्या मोर्चाला भाड्याने माणसं? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 24 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याची चर्चा आहे. राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. दरम्यान, 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात CBI ने 4 फरार आरोपींना अटक केली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार जाहीर करणार राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव जाहीर करण्याची शक्यता. येत्या 26 मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत आणि जाहीर होणारे उमेदवार त्यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. संभाजीराजेंना शिवसेना देणार शह, कोल्हापुरातून देणार दुसरा उमेदवार? राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje) यांना शिवसेनेनं ऑफर दिली होती. पण, संभाजीराजेंनी सेनेची ऑफर नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याची चर्चा आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. निवडणूक आयोग लागले तयारीला राज्य निवडणूक आयोगाने ( Election Commission) राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 जूनपर्यंत जाहीर केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात CBI ने 4 फरार आरोपींनी केली अटक 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये (1993 Mumbai Bomb Blast Case) सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने चार जणांना अटक केली आहे. या चारही जणांना सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 'आई मी सुट्टीवर येणार आहे'.. सांगलीच्या जवानाचे हे शब्द ठरले शेवटचे सांगलीतील मिरज तालुक्यातील कुपवाड येथील रवींद्र नारायण नरळे (Jawan Ravindra Narale) या जवानाचं पश्चिम बंगाल येथील पाणागड येथे सेवा बजावताना अकस्मात निधन झालं. नरळे आर्मी मेडिकल कोअर (AMC) 189 मिलीटरी हॉस्पिटल पाणागड (Panagarh West Bengal) येथे नाईक या पदावर सेवा बजावत होते. या बातमीनंतर कुपवाड गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला तासानं माणसं आणली पाणी प्रश्नाच्या मुद्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा (bjp aakrosh morcha aurangabad) काढण्यात आला होता. पण या मोर्चाला तासांने माणसं आणली होती, असा गंभीर आरोप शिवसेनेचे अंबादास दानवे (ambadas danve) यांनी केला आहे. तसंच, एक व्हिडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: BJP, Shivsena

    पुढील बातम्या