जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संभाजीराजेंना शिवसेना देणार शह, कोल्हापुरातून देणार दुसरा उमेदवार?

संभाजीराजेंना शिवसेना देणार शह, कोल्हापुरातून देणार दुसरा उमेदवार?


 शिवसेना सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 23 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje) यांना शिवसेनेनं ऑफर दिली होती. पण, संभाजीराजेंनी सेनेची ऑफर नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याची चर्चा आहे. शिवसेना सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीराजेंना कोल्हापुरातूनच शह देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार (sanjay pawar) यांना ही संधी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसंच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे संजय पवार यांना शिवसेना संधी देणार आहे का, हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान,  कोणत्याही अपक्ष उमेदवाराला शिवसेना पाठिंबा करणार नाही. दोन्ही उमेदवार शिवसेनेचाच असणार आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे.  राज्यसभा दोन्ही जागांसाठी पुरेसं नाही तर जास्त संख्याबळ आहे, असा दावाच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ( BA च्या विद्यार्थ्याच 12 वीतील तरुणीसोबत लग्न; सकाळी सापडला पतीचा मृतदेह ) तसंच,  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्या शिट्टी वाजेल. आम्ही निरोपाची वाट बघत नाही. 2 जागा शिवसेना लढवणार आणि जिंकणार आहे, असंही राऊत म्हणाले. ( भाजपच्या मोर्चाला तासानं माणसं आणली, सेनेच्या नेत्याचा दावा, व्हिडीओही व्हायरल ) ‘शिवसेना अनेक वर्षापासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्यातील दोन जागा शिवसेना लढवत आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ. शिवसेनेचे स्वत:चे उमेदवार असताना आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा कसा देऊ शकतो? त्यामुळेच आम्ही संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी ते आग्रही आहेत’, असंही संजय राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात