Home /News /mumbai /

निवडणूक आयोग लागले तयारीला, 13 महापालिकांची आरक्षण सोडत 13 जूनला!

निवडणूक आयोग लागले तयारीला, 13 महापालिकांची आरक्षण सोडत 13 जूनला!

मुंबई महापालिका अतिमूसळधार विभागात येत असूनही राज्य निवडणूक आयोगाचे वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका अतिमूसळधार विभागात येत असूनही राज्य निवडणूक आयोगाचे वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका अतिमूसळधार विभागात येत असूनही राज्य निवडणूक आयोगाचे वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.

    मुंबई, 23 मे :  राज्य निवडणूक आयोगाने ( Election Commission) राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 जूनपर्यंत जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने येत्या 31 मे रोजी 13 प्रलंबित महापालिकांच्या प्रभागांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. 'नवी मुंबई, वसई विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसंच, राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाहीत, असंही  निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. (हवामान : Yellow, Orange आणि Red अलर्ट काय आहेत? रंगावरुन असा ओळखा धोका) आरक्षण सोडतीमध्ये पावसाळ्यात अती मुसळधार कोकणातील महापालिकांचाही समावेश करण्यात आला आहे.  नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, वसई-विरार या अतीमुसळधार विभागातील महापालिकांचाही समावेश केला आहे. (सावधान! तुमचं संपूर्ण करिअर येईल धोक्यात; तुम्हालाही 'या' वाईट सवयी नाहीत ना?) मुंबई महापालिकेतील वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिकेला 31 मे रोजी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहे. मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहाणार आहे. मुंबई महापालिका अतिमूसळधार विभागात येत असूनही राज्य निवडणूक आयोगाचे वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या