Home /News /mumbai /

BREAKING : 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात CBI ने 4 फरार आरोपींना केली अटक

BREAKING : 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात CBI ने 4 फरार आरोपींना केली अटक

 या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले

या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले

या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले

मुंबई, 23 मे : 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये (1993 Mumbai Bomb Blast Case) सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे.  बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने चार जणांना अटक केली आहे. या 4 ही जणांना सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. ( four wanted accused in 1993 Mumbai bomb blast case) मिळालेल्या माहितीनुसार, 1993 बॉम्बस्फोट प्रकरणात सीबीआयने 4 जणांना ताब्यात घेतले आहे.  सय्यद कुरेशी, शोएब कुरेशी,  शोएब बाबा, युसूफ भटका आणि अबू बकर अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांना गुजरात एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. केंद्रीय यंत्रणेने या चार जणांना मुंबईतून ताब्यात घेतले आहे. या चौघांना आता ७ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे.  बनावट पासपोर्टच्या आधारे हे चारही आरोपी पाकिस्तानात फरार झाले होते. 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर हे सर्व आरोपी परदेशात पळून गेले होते. हे आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादमध्ये आले होते. या संदर्भात गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गुजरात एटीएसची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, NIAच्या तपासात मोठा खुलासा दरम्यान, दहशतवादी कारवाया करणारा दाऊद इब्राहिम आता राजकीय नेत्यांच्या मुळावर उठलाय, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासातून समोर आला आहे. दहशतवादी कारवाया घडवून आणणारा दाऊद आता राजकीय नेत्यांना टार्गेट करत आहे. त्यात विशेष करुन हिंदूत्ववादी नेत्यांचा समावेश आहे, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासात झाला आहे. NIAने 9 मे रोजीच्या पहाटे मुंबईसह नालासोपारा आणि इतर असे एकूण 27 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यानंतर NIAने 57 लोकांना चौकशीकरता बोलावले होते. ज्यापैकी 18 जणांची NIA कसून चौकशी करत होती. त्यापैकी छोटा शकीलचे नातेवाईक आरीफ आणि शब्बीर शेख या दोघांच्या विरोधात NIAला ठोस पुरावे आढळल्याने त्यांना NIAने 13 मेच्या पहाटे अटक करुन कोर्टात हजर केले. 1993 च्या बॅाम्बस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. पण नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या नंतरही हे दोघे छोटा शकील मार्फत डी गॅंगच्या संपर्कात आहेत. हे अनेकदा समोर आले होते. पण देशात घातपात घडवण्यासाठी डी गॅंग रचत असलेल्या कटात हे दोघे शामिल होते, याचा खुलासा NIA ने काही दिवसांपूर्वी कोर्टात केला होता.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या