जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला तासानं माणसं आणली, सेनेच्या नेत्याचा दावा, व्हिडीओही व्हायरल

भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला तासानं माणसं आणली, सेनेच्या नेत्याचा दावा, व्हिडीओही व्हायरल

या व्हिडीओमध्ये या काही महिलांना मोर्चासाठी बोलावले होते. शहरातील पैठण गेट परिसरात या महिलांना चार गाड्यांनी सोडले होते.

या व्हिडीओमध्ये या काही महिलांना मोर्चासाठी बोलावले होते. शहरातील पैठण गेट परिसरात या महिलांना चार गाड्यांनी सोडले होते.

या व्हिडीओमध्ये या काही महिलांना मोर्चासाठी बोलावले होते. शहरातील पैठण गेट परिसरात या महिलांना चार गाड्यांनी सोडले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 23 मे : पाणी प्रश्नाच्या मुद्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा (bjp aakrosh morcha aurangabad) काढण्यात आला होता. पण या मोर्चाला तासांने माणसं आणली होती, असा गंभीर आरोप शिवसेनेचे अंबादास दानवे (ambadas danve) यांनी केला आहे. तसंच, एक व्हिडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे. भाजपच्या जन आक्रोश मोर्चाने औरंगाबाद शहर ढवळून निघाले होते. हा मोर्चा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. या मोर्चात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. पण, मोर्चाला पैसे देऊन माणसं आणली होती, असा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये या काही महिलांना मोर्चासाठी बोलावले होते. शहरातील पैठण गेट परिसरात या महिलांना चार गाड्यांनी सोडले होते. तसंच, आणखी चार गाड्या येऊन गेले होते. आम्हाला तासाच्या हिशोबाने पैसे दिले होते, असा दावा या महिलांनी केला आहे. . News18लोकमत ने या विडिओ ची सत्यता पडताळलेली नाही. ( हवामान : Yellow, Orange आणि Red अलर्ट काय आहेत? रंगावरुन असा ओळखा धोका ) दरम्यान, या मोर्चाला एका एजन्सीच्या मदतीने माणसं आणण्यात आली होती, भाजपचा दावा फोल ठरला आहे. त्यांनी या एजन्सीच्या मदतीतून पैसे देऊन माणसं बोलावली होती, असा आरोप शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला आहे. ( सावधान! तुमचं संपूर्ण करिअर येईल धोक्यात; तुम्हालाही ‘या’ वाईट सवयी नाहीत ना? ) ‘संभाजीनगरचा जल आक्रोश मोर्चा हा खरंच मोर्चा होता का इव्हेंट ? फुगड्या,उंट कश्यासाठी ? या मोर्च्यात गांभीर्य हवं.  फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे विषय मांडले असले तरी चाललं असतं, मोर्च्याची गरज काय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहे, या  सभेत उत्तर देतील, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात