मराठी बातम्या /बातम्या /देश /देवेंद्र फडणवीस घेऊन आलेला बॉम्ब लवंगी फटका निघाला, राऊतांचा टोला

देवेंद्र फडणवीस घेऊन आलेला बॉम्ब लवंगी फटका निघाला, राऊतांचा टोला

केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये काडीचाही दम नाही.

केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये काडीचाही दम नाही.

केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये काडीचाही दम नाही.

नवी दिल्ली, 24 मार्च : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलीस दलातील बदल्यांबद्दल (police officer transfer racket) महाविकास आघाडी सरकारवर (MVA Goverment) गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खिल्ली उडवली आहे. 'फडणवीस यांच्याकडे कोणतेही पुरावे नसून तो निव्वळ लवंगी फटाका आहे', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.

'राज्यातील लोकांनी केंद्रात आलं पाहिजे. त्यांचा प्रभाव दिसला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगचे आरोप केले होते. त्यांनी केंद्रीय गृह सचिव यांची भेट घेतली असल्याचं कळलंय. त्यांच्याकडे देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये काडीचाही दम नाही. फडणवीस यांनी आणलेला बॉम्ब हा लवंगी फटाका निघाला आहे, त्यांनी जो काही कागद दिला आहे. त्यामध्ये सरकारने चुकीचे काम केले असा कोणताच उल्लेख नाही, ती कागदपत्र जाहीर करावी,'  असा टोला राऊत यांनी लगावला.

टायगर कॅपिटलमध्ये एकाच दिवसात सापडले 3 वाघांचे मृतदेह, विदर्भात वन्यजीवन धोक्यात

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये असेच पत्र आले होते. पण योगी आदित्यनाथ यांनी काहीच केले नाही, असं स्पष्ट झालं होतं. असे पत्र येतेच असतात. त्याबद्दल गांभीर्याने घेण्यासारखे काहीच नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दरम्यान दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळांनी आज सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते उपस्थितीत होते.

पुण्यातील शाळेला हलगर्जीपणा भोवला, 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

भाजप नेत्यांकडून ही सदिच्छा आणि पूर्वनियोजित भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Hiren mansukh, Sanjay raut