मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune news: पुण्यातील शाळेला हलगर्जीपणा भोवला, 50 टक्के स्टाफ Corona positive, मुख्याध्यापकावर गंभीर आरोप

Pune news: पुण्यातील शाळेला हलगर्जीपणा भोवला, 50 टक्के स्टाफ Corona positive, मुख्याध्यापकावर गंभीर आरोप

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Cases in Pune) चिंतेचा विषय ठरत असतानाच एका शाळेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या विद्यालयातील स्टाफपैकी 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह (Staff Members Tests Corona Positive) आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Cases in Pune) चिंतेचा विषय ठरत असतानाच एका शाळेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या विद्यालयातील स्टाफपैकी 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह (Staff Members Tests Corona Positive) आहे.

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Cases in Pune) चिंतेचा विषय ठरत असतानाच एका शाळेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या विद्यालयातील स्टाफपैकी 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह (Staff Members Tests Corona Positive) आहे.

पुणे 24 मार्च : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Cases in Pune) चिंतेचा विषय ठरत असतानाच अनेकांचा हलगर्जीपणा समोर येत आहे. यात आता आणखी एक भर पडली आहे देहू रोडवरील (Dehu Road) केंद्रीय विद्यालय क्रमांक २ (Kendriya Vidyalaya No. 2) मधील मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणाची. शाळेतील कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यानं याबद्दल ट्वीट केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या ट्विटमधील माहितीनुसार विद्यालयातील 45 पैकी 20 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला (Staff Members Tests Corona Positive) आहे. याचाच अर्थ विद्यालयातील स्टाफपैकी 50 टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आहे.

या व्यक्तीनं याबाबतचं ट्विट करत यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेकांना टॅग केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये या व्यक्तीनं म्हटलं, की केंद्रीय विद्यालय नंबर २ देहू रोड येथील शाळेतील स्टाफमधील अर्ध्या शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. हा सर्व प्रकार मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे, कारण त्यांनी कोरोना नियमांचं पालन केलेलं नाही. या मुख्याध्यापकांनी तापासह इतर त्रास असतानाही शिक्षकांना सुट्टी दिली नसल्याचं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

शाळेतील स्टाफच्या म्हणण्यानुसार, शाळेमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण 9 मार्च रोजी आढळून आला. मात्र, यानंतर मुख्याध्यापक सोजोन पी जॉन यांनी दुर्लक्ष केल्यानं आता हा आकडा 20 वर पोहोचला आहे. कर्मचार्‍यांनी असा आरोप केला आहे, की जॉन यांनी त्यांना प्रोबेशनवर असल्याच्या कारणाने ताप किंवा सर्दी असतानाही सुट्टी देण्यास नकार दिला. स्टाफमधील कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं, की शाळेतील पन्नास टक्के स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आहे. याठिकाणी कोरोनाचे नियम कडक करण्यात आले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. इतकंच नाही तर पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे सर्व आरोप फेटाळून लावत मुख्याध्यापक जॉन म्हणाले, की पहिल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच तात्काळ शाळा बंद ठेवण्यात आली. इतकंच नाही सर्व शिक्षकांना तपासणीसाठी रुग्णालयातही पाठवण्यात आलं. काहींना देहू रोडच्या रुग्णालयात चाचणी करून घेण्यासाठी जाण्याचा सल्लाही देण्यात आला मात्र त्यांनी आमच्यात काहीही लक्षणं नसल्याचं सांगत जाण्यास नकार दिला, असंही त्यांनी म्हटलं.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Corona virus in india, Coronavirus, Covid cases, Covid-19 positive, Pune, School