मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Tiger कॅपिटलमध्ये एकाच दिवसात सापडले 3 वाघांचे मृतदेह, विदर्भात वन्यजीवन धोक्यात

Tiger कॅपिटलमध्ये एकाच दिवसात सापडले 3 वाघांचे मृतदेह, विदर्भात वन्यजीवन धोक्यात

विदर्भात वन्यजीवन धोक्यात आलं आहे का? असा सवाल उपस्थित करणाऱ्या घटना गेल्या 24 तासात घडल्या आहेत. याठिकाणी विविध भागात अवघ्या 24 तासात तीन वाघांता मृत्यू झाला आहे.

विदर्भात वन्यजीवन धोक्यात आलं आहे का? असा सवाल उपस्थित करणाऱ्या घटना गेल्या 24 तासात घडल्या आहेत. याठिकाणी विविध भागात अवघ्या 24 तासात तीन वाघांता मृत्यू झाला आहे.

विदर्भात वन्यजीवन धोक्यात आलं आहे का? असा सवाल उपस्थित करणाऱ्या घटना गेल्या 24 तासात घडल्या आहेत. याठिकाणी विविध भागात अवघ्या 24 तासात तीन वाघांता मृत्यू झाला आहे.

तुषार कोहळे, नागपूर, 24 मार्च: विदर्भात वन्यजीवन धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: वाघांबाबतीत (Tiger Death in Vidarbha) धोका वाढला आहे. कारण याठिकाणी 24 तासात 3 वाघांचा मृत्यू (3 Tiger Death Withing 24 hrs) झाल्याची घटना घडली आहे. नागपूर, यवतमाळ आणि पेंच अभयारण्य (मध्यप्रदेश) या ठिकाणी वाघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

एकीकडे हा संशयास्पद मृत्यू तर यवतमाळ आणि पेंच (मध्यप्रदेश) मध्ये वाघांचे अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव वनक्षेत्रात घोसा-सोनेगाव पांदण मार्गाजवळ हा वाघिणीचा मृतदेह सापडला आहे. या वाघिणीच्या गळ्यात तार अडकल्याचेही समोर आले आहे. दरम्यान मृत्यू कशामुळे झाला हे पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. या गेले काही दिवस या परिसरात वारंवार वाघांचे मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून आला असून त्याचे चारही पाय कापलेल्या स्थितीत शिकार झाल्याचे आढळल्याने शिकार उघडकीस आले आहे. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून वन विभागाच्या वन संवर्धन आणि संरक्षणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन आठवड्यातील नागपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूची ही पाचवी घटना आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या रिसाला वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 707 मध्ये वनरक्षक शिंगरपुतळे हे गस्त करीत होते. दरम्यान, त्यांना वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या शरीरावरील संपूर्ण केस गळून पडले होते. मात्र, पायाचे चारही पंजे कापलेल्याचे उघडकीस आले. हा पूर्ण वाढलेला वाघ असून त्याचा मृत्यू सात ते आठ दिवसापूर्वीच झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या नियमानुसार आज वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण शोधण्यात येणार आहे. या घटनेचा तपास वनाधिकारी करीत आहे.

(हे वाचा-महाराष्ट्रात लॉकडाउन की कडक निर्बंध? आज निर्णय होण्याची शक्यता)

गेल्याच आठवड्यामध्ये करांडला अभयारण्यामघ्ये टी1 वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटना वारंवार का घडत आहेत, यामागे वातावरणातील बदल किंवा नैसर्गिक घटना जबाबदार आहेत की माणसांचा जंगलातील हस्तक्षेपामुळे या घटना घडत आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. या वाघांची हत्या शिकारीमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान शिकार की अपघाती मृत्यू याबाबत संदिग्धता कायम आहे. वनविभागाकडून याबाबत ठोस उपाययोजना केली जाईल अशी अपेक्षा वन्यजीव प्रेमी करत आहेत.  दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, विदर्भात गेल्या 78 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 13 वाघांचा मृत्यू गेल्या तीन महिन्यात झाला आहे. वाघाच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असताना आता नागपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकार झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे वन विभागाला आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. 2013 मध्ये बहेलिया शिकाऱ्यांना जेरबंद केल्यानंतर वाघांच्या शिकारी कमी झालेल्या होता. आता त्यातील काही शिकाऱ्यांना न्यायालयाने सोडल्याने शिकारी सक्रीय झाले का असाही कयास लावला जात आहे. यानिमित्ताने वन विभागाच्या संवर्धन व संरक्षणावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. राज्यातील सध्याच्या वाघांच्या संख्येवर नजर टाकली तर राज्यातील वाघांची संख्या 312 आहे. यात  विदर्भातील वाघांची संख्या 305 यातजानेवारी ते मार्च 13 वाघांचे मृत्यू  झाले यात अधिवास लढाईतून 7 वाघांचा मृत्यू झाला तरपाण्यात पडून 1 वाघाचा मृत्यू झाला , शिकारीत 2 वाघांचा मृत्यू झाला तर नैसर्गिक मृत्यू 3 वाघांचा झाला .

वाघांच्या मृत्यूची पुढील कारणे पुढे आली आहे

-वीज प्रवाह सोडल्याने वीजेचा धक्का लागून मृत्यू

-गावातील पाळीव प्राण्यांची शिकार करण्यासाठी वाघ मानवी वस्तीत येतात. हे हल्ले थांबवण्यासाठी विष प्रयोग करण्याचे प्रकार वाढत आहेत. शिकार झालेल्या जनावरावर विषप्रयोग केला जातो.

-अवयवाच्या तस्करीसाठी

First published:
top videos

    Tags: Death, Maharashtra, Mumbai, Shocking news, Tiger, Tiger attack, Vidharbha