जाहिरात
मराठी बातम्या / देश / राज्यात राजकारण तापलं, सोमय्या राज्यपालांना भेटणार, PM मोदींनी बोलावली सर्व CM ची बैठक.. TOP बातम्या

राज्यात राजकारण तापलं, सोमय्या राज्यपालांना भेटणार, PM मोदींनी बोलावली सर्व CM ची बैठक.. TOP बातम्या

राज्यात राजकारण तापलं, सोमय्या राज्यपालांना भेटणार, PM मोदींनी बोलावली सर्व CM ची बैठक.. TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : राणा दाम्पत्याने केलेल्या आरोपांमुळे त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले असून ते राज्यापालांना भेटणार आहेत. तिकडे औरंगाबाद सभेला परवानगी मिळाली नसताना मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, देशात कोरोनाची चौथ्या लाटेचे संकेत मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांवर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, राज्यपालांना भेटणार खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana)  यांना अटक झाल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी (23 एप्रिल) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) खार पोलीस स्टेशनला पोहोचले होते. तेथून परतत असताना किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या हल्ल्यानंतर पोलीस आपला एफआयआर घेत नसल्याचं म्हणत सोमय्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर सोमय्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांचं थेट CISF महासंचालकांना पत्र मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी CISFच्या महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी सीआयएसएफ सेक्युरीटी काय करत होती याची चौकशी करा, अशी सूचना संजय पांडे यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांना दिली आहे. नवनीत राणांनी डी गँगशी संबंधीत व्यक्तीकडून घेतले होते 80 लाख : संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या घरापुढे हुनमान चालीसा पठण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. ईडीने (ed) अटक केलेल्या युसुफ लकडवाला (Yusuf Lakdawala ) याच्याकडून नवनीत राणांनी 80 लाखांचे कर्ज घेतले, असा गंभीर आरोप पुराव्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. मंत्री बच्चू कडूंविरोधात तपास करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडवून देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना मोठा झटका बसला आहे. बच्चू कडूंविरोधात तपास करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने (Akola District Court) दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगाबादच्या सभेआधी मनसे अध्यक्षांचा मोठा निर्णय राज ठाकरे औरंगाबादच्या सभेआधी दोन दिवसांचा पुणे दौरा करणार आहेत. राज ठाकरे 29 आणि 30 एप्रिल रोजी पुण्यात असणार आहेत. त्यानंतर 1 मे रोजीच्या औरंगाबादच्या सभेसाठी ते पुण्यातून जाणार आहेत. नवनीत राणांना ‘कोठडी ड्रामा’ पडणार भारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या घरापुढे हुनमान चालीसा पठण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खासदार नवनीन राणा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नवनीत राणा (navneet rana) यांचा ‘दलित कार्ड’चा प्लॅन फेल जाण्याची शक्यता आहे. आता पोलिसांचीच (mumbai police) बदनामी केल्याप्रकरणी आणखी गुन्हे दाखल होण्याची चिन्ह आहे.  कोल्हापुरात भोंग्यांचा वेगळा प्रयोग कोल्हापुरात मस्जिद, मंदिर, गर्दीची ठिकाणे, खेडेगावात सर्वच ठिकाणी भोंगे पाहायला मिळत आहेत. मात्र, हे भोंगे नैसर्गिक आपत्ती, धार्मिक तेढ निर्माण झाल्यावर घ्यायच्या दक्षता, जिल्हा प्रशासनाचा संदेश देण्यासाठी वापरण्यात येत आहेत. देशातील पहिली सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कोल्हापुरात राबवण्यात आली आहे. कारागृहातून बाहेर पडताच सदावर्ते आक्रमक वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची अखेर जेलमधून सुटका झालीय. विशेष म्हणजे पुणे पोलिसांचं (Pune Police) पथक सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर (Aurthur Road Jail) दाखल होतं. पण कारागृहा प्रशासनाने सदावर्ते यांचा ताबा देण्यास नकार दिला. हायकोर्टाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणं हे आमचं कर्तव्य असल्याचं जेल प्रशासनाने पुणे पोलिसांना सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या विरोधात याचिका संजय राऊत यांनी न्यायालयाविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात बार कौन्सिलने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संकेत! PM मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देशातील कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक बनली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली आहे. प्रशांत किशोर काँग्रेसच्या उंबरठ्यावरून माघारी गेल्या आठवड्याभरापासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला आता दस्तरखुद्द प्रशांत किशोर यांनीच पूर्णविराम दिला आहे. आपण काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश करणार नसल्याची घोषणाच प्रशांत किशोर यांनी केली आहे. जगाचा विनाश करू शकणाऱ्या शस्त्राचा वापर करण्याची रशियाची धमकी रशियाने मंगळवारी नाटोवर छद्मी युद्धात गुंतल्याचा आरोप केला. यामुळे अणुयुद्धाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीला प्रत्युत्तर म्हणून रशियाचं हे वक्तव्य आलं आहे. खरं तर, मंगळवारी, अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसह, जर्मनीच्या विमानतळावर रशियाविरुद्धच्या युद्धात विजयासाठी आवश्यक असलेली अधिक ताकदीची शस्त्रं युक्रेनला पुरवण्याचं वचन दिलं. Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात कराची विद्यापीठात (Karachi University) मंगळवारी दुपारी झालेल्या स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बुरखा घातलेली एक महिला दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात