मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात; आत्मघातकी हल्ला करणाऱ्या बाईचा VIDEO आला समोर

Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात; आत्मघातकी हल्ला करणाऱ्या बाईचा VIDEO आला समोर

कराची (Karachi) विद्यापीठात मंगळवारी दुपारी झालेल्या स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या स्फोटात 3 चिनी नागरिकांसह (Chinese National) चार जणांचा मृत्यू झाला होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

कराची (Karachi) विद्यापीठात मंगळवारी दुपारी झालेल्या स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या स्फोटात 3 चिनी नागरिकांसह (Chinese National) चार जणांचा मृत्यू झाला होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

कराची (Karachi) विद्यापीठात मंगळवारी दुपारी झालेल्या स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या स्फोटात 3 चिनी नागरिकांसह (Chinese National) चार जणांचा मृत्यू झाला होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पुढे वाचा ...

कराची, 26 एप्रिल : कराची विद्यापीठात (Karachi University) मंगळवारी दुपारी झालेल्या स्फोटाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बुरखा घातलेली एक महिला दिसत आहे. ती रस्त्याच्या एका बाजूला उभी असलेली दिसते आणि व्हॅन तिच्या मागून येताना दिसते. व्हॅन महिलेजवळ येताच मोठा आवाज झाला. या स्फोटात 3 चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए - Balochistan Liberation Army) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला एका महिला आत्मघातकी हल्लेखोराने (Female suicide bomber) केल्याचं बीएलएनं म्हटलं आहे. बीएलए हा एक उग्रवादी गट आहे, जो प्रामुख्याने बलुचिस्तान प्रांतात कार्यरत आहे. त्यांनी यापूर्वीही चिनी नागरिक (Chinese National) आणि चिनी हितसंबंधांना लक्ष्य केले आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण पाकिस्तानी कराची शहरातील कराची विद्यापीठ कॅम्पसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर, बीएलएने एका निवेदनात म्हटलंय की, ती शैरी बलोच किंवा ब्रम्श होती. ती या गटाची पहिली महिला हल्लेखोर होती. हा हल्ला बलुचांच्या प्रतिकाराच्या इतिहासातील एक नवा अध्याय आहे. बलुचिस्तानमध्ये सशस्त्र बलुच गटांनी बंडखोरी केली आहे. या ठिकाणी छोट्या-छोट्या घटना घडत आहेत. ते पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांमध्ये अधिक स्वायत्तता आणि अधिक वाटा मिळावा, या मागणीचा ते वारंवार पुनरुच्चार करत राहतात. खरं तर, कराचीच्या या हल्ल्यापूर्वीच, जुलै 2021 मध्ये उत्तर-पश्चिममधील दासू येथे एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला होता, ज्यात नऊ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यावेळी बलुच संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली नव्हती. त्यावेळी पाकिस्तानी तालिबान – ज्याला तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणूनही ओळखलं जातं – या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यात चार पाकिस्तानीही मारले गेले.

येथे, कराचीचे पोलीस प्रमुख गुलाम नबी मेमन म्हणाले की, प्राथमिक तपासात असं दिसतं की, या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोर होता. ते म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजवरून हे स्पष्ट झालं आहे की, स्फोट घडवणारी एक महिला होती आणि तिनं स्वत:ला उडवलं. पाकिस्तानच्या अनेक भागात चिनी नागरिक राहत आहेत. ते येथील बांधकामाशी निगडित असून अन्य काही प्रकल्पांमध्ये काम करत आहेत. विद्यापीठाच्या आतही चिनी नागरिक चिनी भाषा शिकवणाऱ्या चिनी निर्मित कन्फ्यूशियस संस्थेत शिकवायला येत असत. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तीन चिनी नागरिकांमध्ये दोन शिक्षक आणि एक संस्थेचा संचालक होता. चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या अनेक बांधकामांमध्ये हजारो चिनी कामगार पाकिस्तानमध्ये राहतात आणि काम करत आहेत. 'वन बेल्ट वन रोड प्रोजेक्ट' (One Belt One Road Project) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प दक्षिण आणि मध्य आशियाला चीनच्या राजधानीशी जोडण्यासाठी बांधला जात आहे. नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या पाकिस्तानच्या दक्षिणेकडील बंदराला चीनच्या वायव्य शिनजियांग प्रांताशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे. हा चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणार्‍या रस्त्याचा एक भाग आहे. या प्रकल्पामध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प आणि अनेक ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Bomb Blast, Pakistan