Home /News /mumbai /

Mumbai Police आयुक्तांवर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, उद्या राज्यपालांना भेटून तक्रार करणार

Mumbai Police आयुक्तांवर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, उद्या राज्यपालांना भेटून तक्रार करणार

भाजप नेते किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज खार पोलीस स्टेशनला जात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. जवळपास दोन तास किरीट सोमय्या हे पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनमधून बाहेर येत मुख्यमंत्री आणि पोलिसांवर गंभीर आरोप केला.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 एप्रिल : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana)  यांना अटक झाल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी (23 एप्रिल) भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) खार पोलीस स्टेशनला पोहोचले होते. तेथून परतत असताना किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या हल्ल्यानंतर पोलीस आपला एफआयआर घेत नसल्याचं म्हणत सोमय्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर सोमय्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आपला एफआयआर पोलिसांनी घेतलाच नाही. उलट आपल्या नावाने बनावट एफआयआर दाखल केल्याचा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला. इतकेच नाही तर आपली बनावट सही सुद्धा केल्याचं त्यांनी म्हटलं. याच्या विरोधात आज तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. यानंतर किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमधून बाहेर आले आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, ज्या पद्धतीने याच ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 70-80 शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने वांद्रे पोलिसांनी एक बनावट एफआयआर तयार केली. ती एफआयआर खार पोलिसांना पाठवली. ही एफआयआर कॉपी मीडियाला दिली गेली. त्या बनावट एफआयआरच्या आधारे संजय पांडे यांनी कारवाई सुरू केली. त्यानंतर मी आज इथे आलो आणि ऑफिशिअल एफआयआरची मागणी केली. त्यानंतर हे सिद्ध झालं की, पोलिसांनी जी एफआयआर रजिस्टर करुन करावाई सुरू केली त्यावर सोमय्यांची सही नाहीये. वाचा : झेड सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला? वाचा काय म्हणाले किरीट सोमय्या... आयपीएसी 154 अंतर्गत एफआयआरवर किरीट सोमय्याची सही असायला हवी. हे मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती नाहीये का? सही नसताना मुंबई पोलिसांनी एफआयआर रजिस्टर्ड केली आहे ते उद्धव ठाकरेंच्या गुंडांना वाचवण्यासाठी केली आहे. आज दोन तास खार पोलिसांनी मला बसवलं एफआयआर घेतो म्हणाले.... त्यानंतर पोलीस आयुक्तांचा फोन आला मग सर्व कागद फाडून टाकले असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी इथे पोलीस स्टेशनच्या आवारातमाझा जीवघेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भाजपची लढाई सुरूच राहणार आहे. उद्या साडे बारा वाजता आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत. बनावट एफआयआर नोंदवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन व्हायला हवं असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Mumbai police

    पुढील बातम्या