मराठी बातम्या /बातम्या /विदेश /युद्ध आणखी भयंकर होणार? जगाचा विनाश करू शकणाऱ्या शस्त्राचा वापर करण्याची रशियाची धमकी

युद्ध आणखी भयंकर होणार? जगाचा विनाश करू शकणाऱ्या शस्त्राचा वापर करण्याची रशियाची धमकी

Russia Ukraine War: युक्रेनला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीला प्रत्युत्तर म्हणून रशियाचं हे वक्तव्य आलं आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, अणुयुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. तो हलक्यात घेऊ नये.

Russia Ukraine War: युक्रेनला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीला प्रत्युत्तर म्हणून रशियाचं हे वक्तव्य आलं आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, अणुयुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. तो हलक्यात घेऊ नये.

Russia Ukraine War: युक्रेनला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीला प्रत्युत्तर म्हणून रशियाचं हे वक्तव्य आलं आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, अणुयुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. तो हलक्यात घेऊ नये.

पुढे वाचा ...

मॉस्को, 26 एप्रिल : रशियाने मंगळवारी नाटोवर छद्मी युद्धात गुंतल्याचा आरोप केला. यामुळे अणुयुद्धाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीला प्रत्युत्तर म्हणून रशियाचं हे वक्तव्य आलं आहे. खरं तर, मंगळवारी, अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसह, जर्मनीच्या विमानतळावर रशियाविरुद्धच्या युद्धात विजयासाठी आवश्यक असलेली अधिक ताकदीची शस्त्रं युक्रेनला पुरवण्याचं वचन दिलं.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, अणुयुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. हे हलक्यात घेऊ नये. सोमवारी रशियाच्या चॅनल वन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. लाव्हरोव्ह यांनी पुनरुच्चार केला की, जानेवारीमध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांनी आण्विक युद्धाच्या अस्वीकार्यतेवर विधान केलं होतं.

'अणुयुद्धाचा धोका खरा आहे'

रशियन परराष्ट्र मंत्री म्हणाले की, धोका गंभीर आहे, तो खरा आहे, त्याला कमी लेखू नये. रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रे दिल्याचा आरोपही त्यांनी केला. नाटो आघाडी रशियाशी युद्धात गुंतली आहे. 'NATO छद्मी पद्धतीने रशियाविरुद्दच्या युद्धात गुंतलेले आहे आणि त्या युक्रेनला शस्त्र पुरवठा करीत आहे. हे सर्व विशेष ऑपरेशनअंतर्गत घडत आहे. त्यांना रशियन सैन्याला लक्ष्य करायचं आहे.' युद्धाचा अर्थ युद्ध असाच होतो, असं ते म्हणाले.

हे वाचा - रशियासाठी मारियुपोलवरील विजय का आहे महत्त्वाचा? पुतिननी याला का म्हटलंय 'मुक्ती'

'रशियाविरुद्ध युक्रेनसोबत जगभरातील देश'

रशियन सैन्याने कीवमधून माघार घेतल्याने आणि आता युक्रेनच्या पूर्वेकडील भागात पुतिनच्या सैन्याचा पराभव होत आहे. अशा स्थितीतच, यूएस संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी 40 हून अधिक देशांतील अधिकार्‍यांची युरोपमधील यूएस वायू शक्ती मुख्यालय असलेल्या रॅमस्टीनमध्ये भेट घेतली. "रशियाच्या साम्राज्यवादी आक्रमणाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला पाठिंबा देण्याच्या आमच्या संकल्पात जगभरातील राष्ट्रे एकजूट आहेत," असं ऑस्टिन म्हणाले. युक्रेनला स्पष्टपणे विश्वास आहे की, ते जिंकू शकतात आणि म्हणूनच इथे प्रत्येकजण असाच विचार करतो."

हे वाचा - तिळ्या मुलींना जन्म, तरीही तिसरी बहीण मोठ्या दोघींहून 4 वर्षांनी लहान! कसं काय?

विशेष म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या युक्रेन भेटीनंतर अमेरिकेने युक्रेनला नवीन लष्करी मदत आणि राजनैतिक समर्थन जाहीर केलं आहे. दोन्ही नेत्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की आणि त्यांच्या सल्लागारांना सांगितलं की, अमेरिका 30 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त परदेशी लष्करी निधी देईल आणि 16.5 कोटी डॉलर्स किमतीच्या दारूगोळा विक्रीला देखील मान्यता देण्यात आली आहे.

First published:

Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news