मराठी बातम्या /बातम्या /देश /

Rahul Gandhi PC: 'शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे हल्ले', लखीमपुर खेरी हिंसा प्रकरणावर राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi PC: 'शेतकऱ्यांवर सरकारचे पद्धतशीरपणे हल्ले', लखीमपुर खेरी हिंसा प्रकरणावर राहुल गांधींची टीका

लखीमपूर खेरी प्रकरणानंतर देशभरातील वातावरण चिघळलं आहे. याठिकाणी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी देखील सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे

लखीमपूर खेरी प्रकरणानंतर देशभरातील वातावरण चिघळलं आहे. याठिकाणी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी देखील सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे

लखीमपूर खेरी प्रकरणानंतर देशभरातील वातावरण चिघळलं आहे. याठिकाणी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी देखील सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: लखीमपूर खेरी प्रकरणानंतर देशभरातील वातावरण (Lakhimpur Violence) चिघळलं आहे. याठिकाणी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते सातत्याने लखीमपूर खेरी गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यासोबत लखीमपूरला जाण्याची घोषणा केली आहे, परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही. शेतकऱ्यांवर पद्धतशीर हल्ला होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi PC on 06th October)  यांनी लखीमपूर खेरी येथील हिंसाचारावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना गांधी म्हणाले की, रविवारी मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूर खेरीला भेट देण्याचा प्रयत्न करतील. याबाबत राहुल गांधी म्हणाले की आम्ही तिघेजण जात आहोत. कलम 144 5 लोकांना लागू होतो.

दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये जाण्यापूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi Press Conference LIVE today on Lakhimpur Kheri) यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की काही काळापासून भारतातील शेतकऱ्यांवर सरकारकडून हल्ले होत आहेत, शेतकऱ्यांना जीपने चिरडले जात आहे, त्यांचा खून केला जात आहे.

ते पुढे म्हणाले की, 'भाजपच्या गृहमंत्र्यांविषयी याठिकाणी बोललं जात आहे, त्यांच्या मुलाविषयी  बोललं जात आहे मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आहे.

वाचा-पवारांची टीका झोंबली, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने चक्क भेट नाकारली!

'दुसरीकडे शेतकऱ्यांवर पद्धतशीरपणे आक्रमण होत आहे आणि त्यामुळेच शेतकरी दिल्लीबाहेर बसले आहेत. त्याची सुरुवात भूसंपादन विधेयकापासून झाली, त्यानंतर तीन कृषी कायदे मंजूर झाले. आता पद्धतशीर जे शेतकऱ्यांचं आहे ते ओरबाडून घेतलं जात आहे आणि ही चोरी सर्वांसमोर होत आहे', अशी प्रतिक्रिया यावेळी राहुल गांधी यांनी दिली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील फटकारले. विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खेरीला भेट देऊ शकले नाहीत अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

भारतात आता हुकूमशाही

राहुल गांधी म्हणाले की, पूर्वी भारतात लोकशाही होती परंतु आता हुकूमशाही आहे. केवळ काँग्रेसचे नेते यूपीमध्ये जाऊ शकत नाहीत, त्यांना रोखले जात आहे. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही यूपीला जाण्याची परवानगी नाही.

राहुल गांधी म्हणाले की, 'विरोधी पक्ष म्हणून आमचे काम म्हणजे सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव आणणे. जर आम्ही हे केले नसते तर हातरसमध्येही काहीही झाले नसते'. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांना लखनऊ विमानतळावर रोखल्याबद्दलही त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की कलम 144 चार किंवा अधिक लोकं एकत्र जमण्याशी संबंधित आहे, परंतु बघेल तर एकटेच होते.

वाचा-राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, म्हणाले...

त्याचबरोबर प्रियंका गांधींच्या अटकेच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, प्रियंकांना अटक करण्यात आली आहे, पण इथे मोठा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे. आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल बोलेल.

First published:

Tags: Rahul Gandhi (Politician), Uttar pradesh news, Yogi Aadityanath