नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज दुपारी नवी दिल्लीत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी पवारांची भेट नाकारली असल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि यांची भेट ऐनवेळी नाकारली असल्याची बाब आता समोर आली आहे. आज दुपारी पियूष गोयल आणि शरद पवार यांची नियोजित भेट होणार होती. पण, अचानक ही भेट नाकारण्यात आली.
Explainer: बलात्कार झाला की नाही हे तपासण्यासाठी IAFमध्ये टू फिंगर टेस्टचा वापर?
भेट का नाकारली या संदर्भात कारण मिमासा नाही.पण, शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतल्यामुळे तर ही भेट नाकारण्यात आली नाही ना? असे प्रश्न निर्माण झाली आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला होता. 'शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध करतो, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, जे घडलं त्याची वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू होते. शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच परिस्थिती उत्तरप्रदेशात निर्माण झाली आहे' अशी जळजळीत टीका पवारांनी केली होती.
Oh no! उत्साहात मिठी मारणं पडलं महागात; कपलसोबत काय घडलं पाहा Video
'२६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्यावर हल्ला केला गेला. त्यानंतर आता उत्तरप्रदेशात ही घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांवरील हल्ल्यातून केंद्राची वृत्ती कळली आहे. देशभरातील शेतकरी याला उत्तर देईल. शेतकरी वर्ग एकटा नाहीये सर्व जनता बळीराजाच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील ती उचलू असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना चिरडताना दिसली SUV
गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान वेगळंच चित्र पाहायला मिळालं. याठिकाणी झालेल्या दंग्यात 8 जणांचा मृत्यू झाला. आपल्या बचावासाठी भाजप मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचं म्हटलं जात होतं. आता या प्रकरणात एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये एक SUV गाडी शेतकऱ्यांच्या अंगावर घातली गेल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गाडी कोण चालवत आहे, हे स्पष्ट दिसत नाहीये. या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतं, की काही शेतकरी रस्त्यावरुन चाललेले आहेत. इतक्यात मागून एक काळ्या आणि मिलिट्री रंगाची SUV येते आणि शेतकऱ्यांना मागून धडक देत पुढे निघू लागते. यात एक वयोवृद्ध शेतकरी गाडीच्या बोनटवर पडताना स्पष्ट दिसतो. हा व्हिडीओ फार स्पष्ट नाही. मात्र, ज्या पद्धतीनं ही गाडी पुढे जाते ते पाहून जाणवतं की शेतकऱ्यांनी चिरडून ती पुढे गेली आहे. घटनास्थळी एकच गोंधळ उडतो. काही लोक मागे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचं दिसतं. इतक्यात मागून काळ्या रंगाची आणखी एक SUV येते आणि वेगात पुढे जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.