मराठी बातम्या /बातम्या /देश /

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, काँग्रेसची स्तुती करत म्हणाले... Watch Video

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, काँग्रेसची स्तुती करत म्हणाले... Watch Video

या व्हिडिओत (Video) राहुल गांधी यांच्यसोबत झालेल्या भेटीत नेमकं काय झालं याबद्दल संजय राऊत सांगत आहेत.

या व्हिडिओत (Video) राहुल गांधी यांच्यसोबत झालेल्या भेटीत नेमकं काय झालं याबद्दल संजय राऊत सांगत आहेत.

या व्हिडिओत (Video) राहुल गांधी यांच्यसोबत झालेल्या भेटीत नेमकं काय झालं याबद्दल संजय राऊत सांगत आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: शिवसेना नेते संजय राऊत (Shiv sena Leader Sanjay Raut) यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress Leader Rahul Gandhi) यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखमीपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर संजय राऊत यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत (Video) राहुल गांधी यांच्यसोबत झालेल्या भेटीत नेमकं काय झालं याबद्दल संजय राऊत सांगत आहेत.

या व्हिडिओत संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाची स्तुती सुद्धा केली आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले संजय राऊत

राहुल गांधी यांच्यासोबत माझी चर्चा झाली. राहुल गांधी यांच्यासोबत मी मोकळेपणानं बोलत असता. तसंच त्यांच्यासोबत चर्चा करत असतो कारण ते देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे मुख्य नेते आहेत. काँग्रेसशिवाय या देशात विरोधकांचं एक पान देखील हलू शकत नाही. मग कुणी काहीही म्हटलं तरी. काँग्रेस आजही गावागावात आहे. मग निवडणुकीत निकाल काही लागला तरी. मात्र एकच पक्ष आहे जो संपूर्ण देशात उभा आहे. एक शिवसेना आणि दुसरा काँग्रेस पक्ष.

हेही वाचा-  दहशत...दोन तासात 3 नागरिकांची हत्या, नागरिक घाबरले

पुढे संजय राऊत म्हणाले की, माझ्यासोबत राहुल गांधी यांनी मोकळेपणानं चर्चा केली. आम्ही दोघेही अशा स्वभावाची लोकं आहोत की, दोघेही मोकळेपणाने बोलतो. आमच्या दोघाचं चांगल्याप्रकारे जमतं सुद्धा. राहुल गांधींनी म्हटलं की, जसं तुम्ही म्हणालात वादळ येणार आणि वादळ येणारचं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणाले संजय राऊत

सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून अन्यथा हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही गाडी चढवू शकतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणानंतर संजय राऊत यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांचीशी या प्रकरणावर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना या घटनेचा निषेध व्यक्त केला.

हेही वाचा-  वीजसंकट! 4 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा; चीनप्रमाणे भारतातही होऊ शकतो ब्लॅकआउट?

'लखीमपूर खेरीच्या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची गरज आहे अन्यथा हे लोक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गाडी चढवू शकतात. विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे',असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे. अनेक विषय आहे, त्यामुळे सगळ्यांबद्दल बोलू शकत नाही. काही विषय हे आमच्यात राहु द्या. लखीमपूरमध्ये जाण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. शिष्ठमंडळ लवकरच तिथे भेट देणार आहे. त्याबद्दल माहिती दिली जाईल, पण, देशात आज लोकशाही उरली आहे का? लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही राऊत म्हणाले.

First published:

Tags: Rahul Gandhi (Politician), Sanjay Raut (Politician), काँग्रेस