Home /News /national /

Twitter वर जगातील दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले पंतप्रधान मोदी; पहिल्या स्थानी कोण?

Twitter वर जगातील दुसरे सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरले पंतप्रधान मोदी; पहिल्या स्थानी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - Shutterstock)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - Shutterstock)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या वर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

    नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : कंझ्युमर इंटेलिजन्स कंपनी ब्रँडवॉचच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या वर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या (Most Influential Personality on Twitter) यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरही (Sachin Tendukar) या यादीत ३५ व्या स्थानावर आहे. अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं बळकावल्याचा अमेरिकेचा दावा; भारताने फेटाळला रिपोर्ट उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या सचिनने ५० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अमेरिकन अभिनेते ड्वेन जॉन्सन आणि लिओनार्डो डिकॅप्रियो आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यापेक्षा वरचे स्थान पटकावले आहे. संशोधनात तेंडुलकरला या स्थानी आणण्यासाठी त्याचं 'वंचितांसाठी प्रशंसनीय कार्य, त्यांच्यासाठी आवाज उठवणे आणि योग्य मोहिमांसाठी मार्ग दाखवणे, तसंच त्याचे प्रेरित चाहते आणि त्याच्या भागीदार ब्रँड्सच्या संबंधित प्रभावशाली मोहिमांमुळे सचिन तेंडुलकर या यादीत ३५ व्या स्थानावर असल्याचं संशोधनात म्हटलं आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत अखिलेश यादवांचा Samajwadi Perfume, मतदार आकर्षित होणार? राज्यसभा सदस्य भारताचा माजी कर्णधार तेंडुलकर एका दशकाहून अधिक काळ युनिसेफशी जोडला गेला आहे आणि 2013 मध्ये त्यांना दक्षिण आशियाचे दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. तेंडुलकरने ग्रामीण आणि शहरी भारतातील आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. याच कारणामुळे ट्विटरवरील जगभरातील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सचिन तेंडुलकरनं स्थान पटकावलं आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: PM narendra modi, Sachin tendulkar, Twitter

    पुढील बातम्या