मराठी बातम्या /बातम्या /india-china /अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं बळकावल्याचा अमेरिकेचा दावा; भारताने फेटाळला रिपोर्ट

अरुणाचल प्रदेशचा भाग चीननं बळकावल्याचा अमेरिकेचा दावा; भारताने फेटाळला रिपोर्ट

India China dispute: अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या म्हणजे पेंटागॉनच्या (Pentagon Report) सूत्रांनी एक रिपोर्ट जाहीर केला होता. त्यामध्ये भारतीय हद्दीत (Arunachal Pradesh) चीनने एक संपूर्ण गाव वसवल्याचा दावा होता.

India China dispute: अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या म्हणजे पेंटागॉनच्या (Pentagon Report) सूत्रांनी एक रिपोर्ट जाहीर केला होता. त्यामध्ये भारतीय हद्दीत (Arunachal Pradesh) चीनने एक संपूर्ण गाव वसवल्याचा दावा होता.

India China dispute: अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या म्हणजे पेंटागॉनच्या (Pentagon Report) सूत्रांनी एक रिपोर्ट जाहीर केला होता. त्यामध्ये भारतीय हद्दीत (Arunachal Pradesh) चीनने एक संपूर्ण गाव वसवल्याचा दावा होता.

  नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: चीनने भारतीय (India –China Dispute) सीमेत अंतर्गत भागात अरुणाचल प्रदेशामध्ये (Arunachal Pradesh china claim ) एक गाव वसवल्याचा अमेरिकेचा (Pentagon Report on China) दावा भारतीय संरक्षण खात्यातल्या सूत्रांनी फेटाळला आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या म्हणजे पेंटागॉनच्या सूत्रांनी एक रिपोर्ट जाहीर केला होता. त्यामध्ये भारतीय हद्दीत चीनने एक संपूर्ण गाव वसवल्याचा दावा होता.  ‘ज्या प्रदेशात चीननं गाव वसवल्याचा दावा करण्यात आला आहे त्यावर चीनचंच नियंत्रण आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं ANI या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. ‘सुबनसिरी जिल्ह्याच्या (Arunachal Pradesh disputed village) ज्या भागात गाव वसवण्यात आल्याचं अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे तो भाग सुरुवातीपासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे,’ अशी माहिती भारतीय संरक्षण खात्याशी संबंधित सूत्रानं दिली आहे.

  ‘गेल्या काही वर्षांपासून चिनी सैन्याची तिथे चौकी आहे. जो दावा केला जात आहे ते बांधकाम सध्या झालेलं नाही,’ असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. ‘अरुणाचल प्रदेशात 1959 मध्ये आसाम रायफल पोस्टजवळ पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) कब्जा केला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घडलेली ही घटना लोंगजू घटना नावानं ओळखली जाते. त्याच नियंत्रणात असलेल्या भागात काही वर्षांपूर्वी चीननं हे गाव वसवलं होतं,’असंही सूत्रांनी सांगितलं.

  New Zealand मध्ये इच्छामरणाचा कायदा लागू, मात्र एका अटीची पूर्तता आवश्यक

  अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीननं गाव वसवल्याचा दावा पेंटागॉन अर्थात अमेरिकेच्या संरक्षण विभागानं केला होता. पूर्व लडाखमधल्या भारत-चीन सैन्याच्या हालचालींबद्दल काँग्रेसला माहिती देताना हा दावा करण्यात आला होता. चीन आपल्या शेजारी राष्ट्रांशी विशेषत: भारताशी अत्यंत विरोधी आणि आक्रमक वागत असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं स्पष्ट म्हटलं होतं.

  दहशतवाद्यांचं टार्गेट ठरताहेत नागरिक, काश्मीरमध्ये आणखी एकाची गोळ्या झाडून हत्या

  भारत म्हणजे अमेरिकेचं एक शस्त्र (रणनीतीचा भाग) म्हणून वागत असल्याचे आरोप चिनी अधिकाऱ्यांनी माध्यमांमधून केले होते. त्याचप्रमाणे सैन्याच्या हालचालींदरम्यान आणि त्यानंतरही भारत आणि अमेरिकेचे संबंध दृढ होऊ नयेत यासाठी चीनकडून पूर्ण प्रयत्न केले जात होते.

  अमेरिकेचा दावा काय होता?

  मे 2020 च्या सुरुवातीला चीनने भारताच्या नियंत्रण क्षेत्रामध्ये घुसखोरी सुरू केली होती. तसंच नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणांवर सैनिक तैनात करण्यात आले होते, असा दावा अमेरिकेच्या संरक्षण खात्यानं केला आहे. एकीकडे सीमेवर तणाव कमी करण्याच्या राजकीय आणि लष्करी पातळीवरील चर्चा सुरू आहेत. तरीही चीननं नियंत्रण रेषेवर दबाव वाढवण्यासाठी कारवाया वाढवल्या असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

  2020 साली चीननं नियंत्रण रेषेच्या पूर्व भागात चिनी तिबेट स्वायत्त परिसर आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशादरम्यानच्या वादग्रस्त परिसरात 100 घरं असलेलं एक नागरी गाव वसवलं होतं, असा दावा अमेरिकेनं केला होता.

  First published:

  Tags: China, India china