Home /News /national /

निर्भयाच्या गुन्हेगारांना 20 मार्चला 5.30 वाजता फाशी; अखेरच्या क्षणी 6 ऐवजी का बदलली वेळ?

निर्भयाच्या गुन्हेगारांना 20 मार्चला 5.30 वाजता फाशी; अखेरच्या क्षणी 6 ऐवजी का बदलली वेळ?

निर्भया प्रकरणात चौघा नराधमांना आता 20 मार्चला फाशी देण्यात येणार आहे. आतापर्यंत चौथ्यांदा कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं आहे. या वेळी सुरुवातीला सकाळी 6 वाजता सांगितलेली फाशीची वेळ अखेरच्या क्षणी बदलली. काय आहे कारण?

    नवी दिल्ली, 4 मार्च : दिल्लीत 2012 मध्ये अमानुषपणे तरुणीचा लैंगिक छळ करून, बलात्कार करून तिला मारणाऱ्या चौघा नराधमांना आता 20 मार्चला फाशी देण्यात येणार आहे. आतापर्यंत चौथ्यांदा कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं आहे. 20 मार्चला पहाटे 5.30 वाजता चौघांना एकत्र फाशी देण्यात येईल. कोर्टात यासंबंधी सुनावणी सुरू असताना सुरुवातीला 6 वाजताची वेळ देण्यात आली होती. अखेरच्या क्षणी ती बदलून 5.30 वाजता फाशी दिली जाईल, असं सांगण्यात आलं. फाशीची वेळ का बदलली याविषयी तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. आपल्या देशाच्या घटनेनुसार आणि कायद्यानुसार दुर्मिळातल्या दुर्मिळ आणि असामान्य गुन्ह्यासाठीच केवळ मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. फाशी देण्यासाठी बरेच नियम आणि प्रथा पाळल्या जातात. फाशीची तयारी कारागृह प्रशासन बराच काळ आधीपासून करत असते. मानवतेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांना मृत्यूच्या वेळी कमीत कमी शारीरिक वेदना व्हाव्यात यासाठीही तयारी केली जाते. संबंधित - निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट अशा अनेक प्रथांपैकीच एक म्हणजे फाशीची वेळ शक्यतो अंधारातली असते. सूर्योदयापूर्वी फाशी देण्याची पद्धत आहे. तसा नियम आहे. फाशीची तारीख 20 मार्च ठरल्यानंतर सकाळी 6 वाजता फाशी दिली जाईल, असं जाहीर करण्यात आलं. पण लगेचच ही वेळ बदलल्याची बातमी आली. 6 ऐवजी सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीला त्या दिवशीच्या सूर्योदयाची वेळ पाहता फाशीच्या अंमलबजावणीची वेळही बदलण्यात आली असावी, अशी चर्चा आहे. आतापर्यंत नेमकं काय झालं? संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील (Nirbhaya Gang Rape Case) दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचं ठरलं आहे. कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केलं आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी कोर्टाची दारं ठोठावत राहिल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झालं होतं. \ संबंधित - 'ती माझी मुलगी असती तर मी तिला जिवंत जाळलं असतं',निर्भया प्रकरणी वकिलांचं विधान तीन वेळा रद्द झाल्यानंतर आता चौथ्या वेळी कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. यावेळी दोषींची फाशी अटळ असल्याचं बोललं जात आहे. याचिकांवर याचिका, तारीख पे तारीख निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्रितपणे 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्यात येईल. यापूर्वी 3 मार्च फाशीची तारीख ठरली होती. पण एक दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याने सुनावणी सुरू झाली आणि फाशी रद्द झाली. पवनची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितलं जात आहे. पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन जन्मठेप द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुसरा दोषी अक्षय यानेसुद्धा नव्याने दया याचिका दाखल केली होती. पण त्याचीही याचिका फेटाळण्यात आली आहे. अन्य बातम्या ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ मालिका वादात शशांक केतकरची उडी जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का? मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरच्या बॅगेतील गोळ्यांमुळे समोर आलं सत्य
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Delhi gang rape, Nirbhaya gang rape case, Nirbhaya Gangrape Case

    पुढील बातम्या