'ती माझी मुलगी असती तर मी तिला जिवंत जाळलं असतं!', निर्भयाच्या दोषींच्या वकिलांची धक्कादायक विधानं

'ती माझी मुलगी असती तर मी तिला जिवंत जाळलं असतं!', निर्भयाच्या दोषींच्या वकिलांची धक्कादायक विधानं

एक मुलगी एका मुलासोबत एवढ्या रात्री काय करत होती ? असा उलटा सवाल हे वकील करतात. माझी मुलगी किंवा बहिणीने असं केलं असतं तर तिला मी माझ्या फार्म हाऊसवर नेऊन सगळ्या कुटुंबीयांच्या समोर पेट्रोल टाकून जाळलं असतं, असंही ते बेशरमपणे म्हणतात.

  • Share this:

अरुणिमा

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : हिंगणघाटच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने आज तिला हेलावलेल्या अंत:करणाने निरोप दिला. तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून तिला जाळणाऱ्या आरोपीला पक़ण्यात आलंय. आता या पीडितेला न्याय मिळणार का, असा संतप्त सवाल सगळे विचारतायत.त्याचवेळी दिल्लीतल्या 'निर्भया' प्रकरणातल्या दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आलीय. सुप्रीम कोर्टाचे वकील अजय प्रकाश सिंह या 3 आरोपींची बाजू मांडतायत. ए.पी. सिंह कायद्यातल्या त्रुटींचा फायदा घेत या दोषींची फाशी टाळण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप होतोय. त्यामुळेच ए. पी. सिंह यांच्यावर तीव्र स्वरूपाची टीका होतेय. 'यांनाच फाशी द्या', असंही काही जणांचं म्हणणं आहे.

आईने सांगितलं म्हणून...

अ‍ॅडव्होकेट ए. पी. सिंह 1997 पासून सुप्रीम कोर्टात वकिली करतायत पण 2012 मध्ये ते निर्भयाच्या आरोपींचं वकीलपत्र घेतल्यामुळे चांगलेच चर्चेत आले. ए. पी. सिंह यांनी न्यूज 18 ला सांगितलं की, मी माझ्या आईच्या सांगण्यावरून ही केस घेतली. निर्भयाच्या दोषींपैकी एकाची पत्नी माझ्या घरी येऊन आईला भेटली आणि तिने हा खटला लढवण्याची विनंती केली.ए. पी. सिंह यांच्या मते, माझी आई टीव्ही पाहत नाही. त्यामुळे निर्भयाच्या बलात्काराचे निषेध मोर्चे, आंदोलनं हे सगळं तिला माहीत नव्हतं.

(हेही वाचा : हिंगणघाट : पुरुषत्वाच्या भ्रामक कल्पना आपण कधी सोडणार?)

एक मुलगी एका मुलासोबत काय करत होती?

आपल्या आईचं ऐकून ए.पी. सिंह यांनी अक्षय आणि विनय अशा दोघांची बाजू कोर्टात मांडली. ते यात अपयशी ठरले पण त्यांनी या दोघांना वाचवण्यासाठी निर्भयाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.  एक मुलगी एका मुलासोबत एवढ्या रात्री काय करत होती ? हे मी विचारलं तर बिघडलं कुठे ? असा उलटा सवाल ते करतात. त्यांच्या समाजात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचं कौतुक होत असेल पण मी ज्या समाजातून येतो त्या समाजात असं होत नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

'तर तिला जाळलं असतं'

कोर्टाच्या बाहेर येऊन ते मीडियाशी बोलताना म्हणाले होते, माझी मुलगी किंवा बहिणीने असं केलं असतं तर तिला मी माझ्या फार्म हाऊसवर नेऊन सगळ्या कुटुंबीयांच्या समोर पेट्रोल टाकून जाळलं असतं.ए. पी. सिंह यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. त्यांची मुलगी सध्या कॉलेजमध्ये शिकतेय. अ‍ॅडव्होकेट ए. पी. सिंह आरोपींना वाचवण्याचं त्यांचं काम करतायत, असं सुप्रीम कोर्टातल्या वकिलांचं म्हणणं आहे पण त्यांच्या या बेजबाबदार विधानांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

====================================================================================================

First published: February 10, 2020, 8:17 PM IST

ताज्या बातम्या