मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का?

जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का?

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus)  3000 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या आता 29 झाली असली, तरी त्यापैकी केरळमधील पहिले तिन्ही रुग्ण बरे झालेत.

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) 3000 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या आता 29 झाली असली, तरी त्यापैकी केरळमधील पहिले तिन्ही रुग्ण बरे झालेत.

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) 3000 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या आता 29 झाली असली, तरी त्यापैकी केरळमधील पहिले तिन्ही रुग्ण बरे झालेत.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 05 मार्च : कोरोनाव्हायरस (coronavirus) शब्द जरी ऐकला तरी पायाखालची जमीन सरकते. जगभरात 3000 पेक्षा जास्त रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वांनीच कोरोनाव्हायरसचा धसका घेतला आहे. आपल्यालाही कोरोनाव्हायरस झाला तर आपलं काय होईल? आपला मृत्यू (coronavirus death) होणार का? अशा प्रश्नांनी मनात घर केलं आहे. मात्र खरंच कोरोनाव्हायरस झाल्यास मृत्यू अटळ आहे का?

भारतात कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या आता 29 झाली असली, तरी त्यापैकी केरळमधील पहिले तिन्ही रुग्ण बरे झालेत. विकसित देशांना जे शक्य नव्हतं, ते भारतानं करून दाखवलं. शिवाय केरळमधील कोरोनाग्रस्त पहिल्या रुग्णानंही या व्हायरसवर मात केल्यानंतर आपला अनुभव मांडला होता. व्हायरसला अगदी समोरून पाहिल्यानं आपण या व्हायरसला घाबरत नाही, असं या रुग्णानं म्हटलं होतं. शिवाय आता कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू अटळ नाही, असं तज्ज्ञांनीही सांगितलं आहे.

कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू अटळ नाही. जितका समजला जातो तितका हा आजार घातक नाही. असं डॉक्टर अंकित गुप्ता यांनी 'न्यूज 18 हिंदी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.  डॉ. अंकित गुप्ता यांच्या मते, कोरोनाव्हायरसची जितकी भीती निर्माण केली जाते आहे, तितका तो घातक नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये हा व्हायरस ठिक झाला आहे.]

डॉ. गुप्ता यांच्या मते, "सार्स, इबोल, स्वाइन फ्लू या व्हायरसच्या तुलनेत कोरोनाव्हायरस खूपच हलका आहे. साध्या सर्दी-खोकल्यापासून न्यूमोनिया आणि एआरडीएस (अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमसारखे आजार बळावतात, त्याच व्हायरसच्या प्रकारातील एक आहे. याची सुरुवातीची लक्षणं सामान्य ताप, सर्दी-खोकल्यासारखीच आहेत. शिवाय श्वास घेण्यातही समस्या आहे. इबोला, सार्स फ्लूच्या तुलनेत यामुळे उद्भवणारा धोका फक्त 2 टक्के आहे."

"कोरोना म्हणजे त्या रुग्णाचा मृत्यू नव्हे. चीनमध्ये हजारो लोकं या आजारातून बरे झालेत. COVID-19 ने ग्रस्त असेल्या ८१ टक्के रुग्णांमध्ये याचा सौम्य असा परिणाम दिसून आला आहे. 18 फेब्रुवारीला China CDC weekly ने Chinese Center for Disease Control and Prevention चा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार, फक्त 13.8 टक्के लोकंच कोरोनामुळे जास्त समस्या आहेत. तर 4.7 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. याचा आर्थ फक्त याच लोकांच्या जीवाला धोका आहे", असंही डॉ. गुप्ता म्हणाले.

"कोरोनाव्हायरस हा हवेमार्फत पसरणारा आजार आहे. त्यामुळे आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे.  तुमच्यासमोर कुणी शिंकत असेल, खोकत असेल तर त्याच्यापासून दूर राहा. कुणाला भेटल्यानंतर एकमेकांना हात मिळवण्याऐवजी स्वत:चे दोन्ही हात जोडून अभिवादन करा. मास्क लावल्याने किमान तोंड, नाक झाकलं जातं मात्र मास्क चांगल्या दर्जाचं असायला हवं. स्वच्छता राखा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, गेलात तर आवश्यक ती काळजी घ्या. हात मिळवू सार्वजनिक ठिकाणी वस्तूंना हात लावू नका. दरवाजे, जिने, लिफ्टमध्येही व्हायरस असू शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी हात लावल्यानंतर हात सॅनिटायझर, साबणाने स्वच्छ धुवा. स्वत:ही स्वच्छता बाळगा", असा सल्ला डॉ. गुप्ता यांनी दिला.

"जितका समजला जातो तितका हा आजार घातक नाही. मात्र 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी जास्त धोकादायक आहे. ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन आणि किडनीची समस्या, डायबेटिज यासारखे आजार असल्यास कोरोनाव्हायरसमुळे गुंतागुंत होऊ शकते. मुलांनाही कोरोनाव्हायरस होऊ शकतो. मात्र वयोवृद्ध व्यक्तींच्या तुलनेत मुलांमध्ये याचं प्रमाण कमी आहे. China CDC Weekly मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, 10 ते 19 वयोगटातील मुलांमध्ये फक्त 1 टक्के प्रकरणं आहेत. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हे इन्फेक्शन 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे आणि कुणाचाही मृत्यू नाही. मुलांमार्फत कोरोना पसरतो आहे. मात्र अनेकदा त्यांच्यामध्ये काही लक्षणं दिसत नाहीत, मुलं या व्हायरसचे वाहक होतात. त्यामुळे लक्षणं दिसताच जवळच्या डॉक्टरांकडे जा किंवा जास्त त्रास होत असल्यास रुग्णालयात जा", असं आवाहन डॉ. गुप्ता यांनी केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus