Home /News /maharashtra /

मेघनाच्या मृत्युचं गूढ उकललं, जिम ट्रेनरच्या बॅगेतील गोळ्यांमुळे समोर आलं धक्कादायक सत्य

मेघनाच्या मृत्युचं गूढ उकललं, जिम ट्रेनरच्या बॅगेतील गोळ्यांमुळे समोर आलं धक्कादायक सत्य

जिम ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या 22 मेघनाचा गेल्या महिन्यात गोळ्यांमधील विषारी घटकामुळे मृत्यू झाला होता

    ठाणे, 10 फेब्रुवारी : औषधी गोळ्या खाल्ल्यानंतर काही तासात ठाण्यातील तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली होती. मेघना देवगड़कर (22) असं त्या मुलीचे नाव आहे. अखेर तिच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करुन ऑनलाईन औषध विक्रीविरोधात दंड थोपटलेल्या मनविसेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांना अन्न व औषध प्रशासनाकडून उत्तर आलं आहे. यानुसार मृत तरुणीने जिममधील ट्रेनर योगेश निकम यांच्या बॅगमधून डायनीट्रोफिनॉलच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. या घातक औषधांमुळे तिचा मृत्यू ओढवल्याचे अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. संबंधित - वजन कमी करण्याच्या गोळ्या घेणं डान्सरच्या जीवावर बेतलं, ठाण्यातील तरुणीचा मृत्यू अन्न व औषध प्रशासनाचं उत्तर मेघनाने जिममधील ट्रेनर योगेश निकम यांच्या बॅगेतील डायनीट्रोफिनॉलच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. या औषधातील घटक अत्यंत हानिकारक असून या औषधाच्या उत्पादन व विक्रीस केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिलेली नाही. अशा प्रकारे अवैध औषधविक्री केल्यास कोरोनासारख्या विषाणूंचा फैलाव होऊ शकतो, अशी भीती पाचंगे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या परिमंडळ – 1 च्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांनी सांगितल्यानुसार परवानाधारक औषधविक्रेत्यांकडून ऑनलाईन औषध विक्री होत असल्याची बाब उपलब्ध नाही. मेघना हिने घेतलेले औषध आयुर्वेदिक नसून जिम ट्रेनरच्या बॅगेतील औषधे आहेत. मेघना देवगडकर डान्सर आणि जीम ट्रेनरसुद्धा होती. मेघनाने जिम ट्रेनर योगेश निकम यांच्या बॅगेतील डायनीट्रोफिनॉलच्या गोळ्या खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मेघनाला थोड्याच वेळात उलट्या सुरू झाल्या. तिथून मेघनाला थेट डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयात तिला थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी मेघनाचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचं सांगितलं. गोळ्या घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आतच मेघनाचा मृत्यू झाला. मेघनाने गोळ्या घेतल्यानंतर तिला हायपरथरमियाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिच्या शरीराचं तापमान अचानक वाढायला लागलं. त्याचबरोबर रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही वाढल्याचं डॉक्टरांनी म्हटले. हे वाचा - संबंधासाठी नकार दिल्याने तरुणाने केली हत्या, ती बहीण असल्याचं लक्षात येताच...
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: 1 death, Cardiac arrest, Gym

    पुढील बातम्या