मुंबई, 16 जून : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी आघाडीची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी आता भाजपकडूनही जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) रामभक्तांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज गुरुवारी सुट्टीची केलेली विनंती ईडीने मान्य केली. राज्य सरकारने तुकडे बंदी कायद्यात बदल केला आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा काही मिनिटांत. विधान परिषदेतला पराभव टाळण्यासाठी आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी विधान परिषदेची निवडणूक पाच दिवसांवर येवून ठेपली आहे. हे पाहता महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ‘त्या’ आमदाराची आता विधान परिषदेला दांडी? राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर (MLA Hitendra Tahkur) यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. पण, आता विधान परिषदेला बविआचे आमदार क्षितीज ठाकूर (mla kshitij thakur) हे अमेरिकेला रवाना झाल्यामुळे एक मत कमी पडणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपही लागली कामाला आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासोबत चर्चा केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सोनिया गांधींच्या प्लॅनिंगला पवारांनी दिला धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) देखील प्रचंड आग्रही होत्या. पण पवारांनी तो प्रस्ताव नाकारल्याने त्यांनी सोनिया गांधी यांच्या प्लॅनिंगला मोठा झटका दिल्याचं मानलं जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आदित्य ठाकरेंची अयोध्येत मोठी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) रामभक्तांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील भाविकांची अयोध्येत योग्य सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांच्यासोबत बातचित करुन महाराष्ट्र सरकार अयोध्येत महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan in Ayodhya) बांधणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राहुल गांधींनी मागितली चौकशी सत्रातून ‘सुट्टी’ नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची मागील तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू होती. अखेर काल दिवसभर चौकशी केल्यानंतर राहुल गांधी यांनी आज गुरुवारी सुट्टीची विनंती केली. ईडीने गुरुवारी चौकशी न करण्याची मागणी मान्य केली आहे. त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी बोलावले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्य सरकारचा मोठा निर्णय तुकडे बंदी कायद्यात बदल राज्यसरकारकडून (State Government) तुकडे बंदी कायदा (Pieces Prohibition Act) लागू करण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना तुकड्याने शेती विकता येत नव्हती. दरम्यान सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आयपीएल मीडियाच्या राईट्समध्ये Viacom18 ची गरुडभरारी जगभरात प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या पुढच्या 5 वर्षांसाठी टीव्ही आणि डिजीटल मीडिया राईट्स (IPL Media Rights) मिळवणाऱ्या कंपन्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. 2023 ते 2027 या वर्षांसाठी व्हायकॉम 18 (Viacom18) ला डिजीटल प्रसारणाचे अधिकार मिळाले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.