जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! अयोध्येत महाराष्ट्रातील भाविकांसाठी 100 खोल्यांचं महाराष्ट्र सदन बांधणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

मोठी बातमी! अयोध्येत महाराष्ट्रातील भाविकांसाठी 100 खोल्यांचं महाराष्ट्र सदन बांधणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सर्वेश श्रीवास्तव,प्रतिनिधी अयोध्या, 15 जून : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) रामभक्तांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे. अयोध्या ही खूप पावनभूमी मानली जाते. अयोध्या ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची जन्मभूमी मानली जाते. या जन्मभूमीत रामलल्लांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. यामध्ये महाराष्ट्रातील भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील भाविकांची अयोध्येत योग्य सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांच्यासोबत बातचित करुन महाराष्ट्र सरकार अयोध्येत महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan in Ayodhya) बांधणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? “एक महत्त्वाचं सांगायचं आहे. आम्ही इथे दर्शन घ्यायला तर आलेलोच आहोत, आपल्या मनातल्या प्रश्नांना एकच उत्तर आहे. ही आमची तीर्थयात्रा आहे. राजकीय यात्रा नाही. इथे राजकारण करायला आलेलो नाहीत, दर्शन घ्यायला आलेलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उद्धव ठाकरे बोलणार आहेत, पत्रव्यवहार करणार आहेत. या पावनभूमीत महाराष्ट्र सदनसाठी देखील जागा बघणार आहेत. साधारणपणे शंभर खोल्यांचं महाराष्ट्र सदन इथे आम्हाला बनवायचं आहे. महाराष्ट्रातील इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक जागा इथे निर्माण करायची आहे”, अशी मोठी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली. ( VIDEO: शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल ) “आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत. गेल्या तीन-चार वर्षाच्या काळात शिवसेना परिवारासोबत अयोध्येत चौथ्यांदा येत आहोत. उत्साह आणि जल्लोष तसाच येत आहे. मंदिर निर्माण होत असताना अजून शिवसैनिक इथे रामलल्लांचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. आमच्यासोबतच्या उत्साह आणि जल्लोष सर्वांपर्यंत पोहोचवा, अशी सर्व माध्यमांना विनंती करतो”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “मी 2018 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पहिल्यांदा अयोध्यामध्ये आलो होतो. तेव्हा त्यांनी पहिले मंदिर फिर सरकार, अशी घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर योगायोगाने आम्ही नोव्हेंबर 2018 मध्ये आलो. ती घोषणा झाल्यानंतर कदाचित असं पूर्ण घडून आलं. त्यानंतर कोर्टाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. एका वर्षात बरोबर नोव्हेंबर 2019 मध्ये कोर्टाचा निकाल आला. कोर्टाच्या निकालामुळे आज इथे मंदिर निर्माण होत आहे. आम्ही कर्टाचे आभार मानत आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात