जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : विधान परिषदेतला पराभव टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी

BREAKING : विधान परिषदेतला पराभव टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी

BREAKING : विधान परिषदेतला पराभव टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 15 जून : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर (Rajya Sabha Election) आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी (MLC Election) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या (Congress) दिग्गज नेत्यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधान परिषदेची निवडणूक पाच दिवसांवर येवून ठेपली आहे. हे पाहता महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली उद्या संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे. ही बैठक संध्याकाळी सहा वाजता सुरु होईल. या बैठकीत शिवसेनेसह, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री सर्व पक्षीय नेत्यांकडून आढावा घेणार आहेत. भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी मतांच्या जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नावर या बैठकीत चर्चा होणार आहे. ( राष्ट्रपती निवडणुकीची मोठी बातमी, राजनाथ सिंह यांचा शरद पवारांना फोन! ) दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची विधान भवनात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात खलबतं झाली. नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवल्याने काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर आहे. दरम्यान, शिवसेनेनं (shivsena) आपल्या आमदाराला निवडणुकीच्या दोन दिवसांआधीच आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. तर भाजपनेही आपले आमदार आता मुंबईतील प्रसिद्ध अशा ताज हॉटेलमध्ये (taj president hotel mumbai) ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे घोडेबाजाराला पुन्हा ऊत येणार आहे. त्यामुळे कागदावर सोपी वाटणारी निवडणूक ही प्रत्यक्षात मात्र अवघड अशीच आहे. भाजपने पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अलीकडे भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. 18 तारखेपासून भाजप आमदारांचा हॉटेलवर मुक्काम असणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपच्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीची पूर्ण जबाबदारी आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. याआधी राज्यसभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर होती. तर राज्यसभा निवडणुकीत आधीच शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आहे. त्यामुळे शिवसेनेनं आतापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीसाठीही पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहे. शिवसेनेचे सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना दिनांक 18 ते 20 जून रोजी पवई येथील “हॉटेल रिनासंन्स” मध्ये मुक्कामी असणार आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार 20 जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात भाजप उमेदवार 1) प्रवीण दरेकर 2) राम शिंदे 3) श्रीकांत भारतीय 4) उमा खापरे 5) प्रसाद लाड शिवसेना 1) सचिन अहिर 2) आमशा पाडवी काँग्रेस 1) चंद्रकांत हंडोरे 2) भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस 1) रामराजे नाईक निंबाळकर 2) एकनाथ खडसे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात