मराठी बातम्या /बातम्या /देश /

जात आणि धर्माच्या बंधनातून मुक्त झाली चिमुकली; मुलीला मिळालं 'No Caste, No Religion' प्रमाणपत्र

जात आणि धर्माच्या बंधनातून मुक्त झाली चिमुकली; मुलीला मिळालं 'No Caste, No Religion' प्रमाणपत्र

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ते म्हणाले, की आमच्या मुलीसाठी देवाचा अर्थ प्रेम असेल. हे प्रेम समानतेवर आधारित असेल. ते पुढे म्हणाले की शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थ्यांना प्रेम आणि समानतेची शिकवण दिली पाहिजे.

  • Published by:  Kiran Pharate

चेन्नई 30 मे : तामिळनाडूमध्ये विल्मा या मुलीला 'ना जात, ना धर्म' असं प्रमाणपत्र (No Caste No Religion Certificate) मिळालं आहे. ही मुलगी साडेतीन वर्षांची आहे. नरेश कार्तिक आणि त्यांची पत्नी गायत्री यांना त्यांची मुलगी विल्मासाठी हे प्रमाणपत्र मिळालं आहे. सीड्रॅप्स एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक नरेश म्हणाले की, मला माझ्या मुलीला कोणत्याही धर्म किंवा जातीच्या बंधनात बांधून ठेवायचं नाही.

ते म्हणाले, की आमच्या मुलीसाठी देवाचा अर्थ प्रेम असेल. हे प्रेम समानतेवर आधारित असेल. ते पुढे म्हणाले की शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थ्यांना प्रेम आणि समानतेची शिकवण दिली पाहिजे.

दररोजच्या शाळेमुळे 11 वर्षांचा मुलगा झाला 'पुष्पा'; दीड महिन्यांनी आला ठिकाण्यावर...

ते म्हणाले, की मी मुलीच्या अॅडमिशनसाठी ज्या शाळांमध्ये गेलो, त्या शाळांमध्ये धर्म आणि जात हा कॉलम आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. हे कॉलम भरल्याशिवाय अर्ज स्वीकारता येणार नाही, असंही सांगितलं गेलं. परंतु 1973 च्या एका सरकारी आदेशानुसार मुलांना शाळेत प्रवेश देताना धर्म आणि जातीचा उल्लेख करणं बंधनकारक नाही.

तामिळनाडू राज्याच्या शिक्षण विभागाने, 1973 आणि 2000 च्या दोन स्वतंत्र आदेशांमध्ये शालेय शिक्षण संचालकांना निर्देश दिले की लोकांनी धर्म किंवा जातीचा उल्लेख न केल्यास हा कॉलम रिकामा ठेवण्याची परवानगी द्या.

भारतातील 80 वर्षीय वृद्धाला पाकिस्तानात घ्यायचाय अखेरचा श्वास! कारण वाचून पाणावतील डोळे

नरेश यांनी कोईम्बतूरचे जिल्हाधिकारी जी.एस. समीरन यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी नरेश यांना उत्तर कोईम्बतूरच्या तहसीलदारांशी संपर्क साधण्यास सांगितलं. हे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तहसीलदारांनी सांगितलं की, या प्रमाणपत्रानंतर त्यांची मुलगी जात आणि धर्माच्या आधारावर कोणत्याही शासकीय आरक्षणासाठी किंवा विशेषाधिकारासाठी अपात्र ठरेल. मुलीच्या वडिलांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यानंतर त्यांना नो कास्ट, नो रिलीजन प्रमाणपत्र देण्यात आलं.

First published:

Tags: Cast, School, Small baby, Small girl, Tamil nadu