Home /News /national /

भारतातील 80 वर्षीय वृद्धाला पाकिस्तानात घ्यायचाय अखेरचा श्वास! कारण वाचून पाणावतील डोळे

भारतातील 80 वर्षीय वृद्धाला पाकिस्तानात घ्यायचाय अखेरचा श्वास! कारण वाचून पाणावतील डोळे

Partition of India: एका 80 वर्षाच्या प्रीतम खान यांची कथा अतिशय संवेदनशील आहे, ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि फाळणीच्या वेळी विभक्त झालेल्या कुटुंबाला भेटण्याची त्यांची इच्छा आहे. अखेरचा श्वास पाकिस्तानमध्ये राहून कुटुंबासोबत घ्यावा, अशी त्यांची इच्छा आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 27 मे : अखंड भारताची झालेली फाळणी (Partition Of India) ही भारतीय स्वातंत्र्यावरील एक भळभळती जखम आहे असं म्हटलं जातं. भारतातून पाकिस्तान (India And Pakistan) वेगळा करून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती तर झाली; पण यामुळे लाखो नागरिकांची आयुष्यंच उद्ध्वस्त झाली. अनेकांच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारे घाव झाले आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्षं झाली तरी या जखमा अजूनही ओल्याच आहेत. अनेकदा त्याच्यावरची खपली निघते आणि त्यातील रक्त पुन्हा एकदा वाहायला लागतं. फाळणीच्या वेळेस आपला देश सोडून आलेल्या अनेकांची आपल्या जन्मभूमीचं अखेरचं दर्शन घेण्याची इच्छा अपुरीच राहिली. तर काहीजण आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्या देशात घालूनही आपल्या जन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी तडफडत आहेत. लुधियाना येथील प्रीतम खान यांची कहाणी अशीच डोळ्यांत पाणी आणणारी आहे. न्यूज नेशनच्या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. फाळणीच्या वेळेस अनेकांची आपल्या कुटुंबांपासून ताटातूट (Seperation Of Families) झाली. कितीतरी कोवळ्या जीवांना फाळणीच्या वेळेस झालेला हिंसाचार आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहावा लागला. आपल्या जीवलगांचा मृत्यू कितीतरीजणांनी पाहिला. पंजाबमधील लुधियानात (Ludhiana) राहणाऱ्या 80 वर्षांच्या प्रीतम खान (Pritam Khan) यांची कहाणीही अशीच अंगावर काटा आणणारी आहे. खरं तर प्रीतम खान आता आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत. फाळणीच्या वेळेस आपल्या विलग झालेल्या कुटुंबाला मरण्यापूर्वी एकदातरी भेटावं अशी त्यांची शेवटची इच्छा आहे. पाकिस्तानात असलेल्या आपल्या कुटुंबाच्या जवळ आपल्याला मृत्यू यावा अशी त्यांची इच्छा आहे. पाकिस्तानी You Tuber नासीर ढिल्लन (Nasir Dhillon) यांनी ही कहाणी समोर आणली आहे. तसंच प्रीतम खान यांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आपल्यापरीने प्रयत्नही करत आहेत. सध्या 80 वर्षांचे असलेले प्रीतम खान यांची फाळणीच्या वेळेस म्हणजे 1947 मध्ये आपल्या कुटुंबापासून ताटातूट झाली. ते त्यांचे वडील आणि भावांपासून वेगळे झाले. फाळणीच्या वेळेस उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्यांची आई आणि ते भारतातच राहिले. तर त्यांचे भाऊ आणि वडील सीमा पार करून पाकिस्तानात पोहोचले होते. त्यावेळेस प्रीतम केवळ 6 वर्षांचे होते. अनेक ठिकाणी लपूनछपून त्यांनी आपला जीव वाचवला. त्यांच्या आईचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक परिस्थितीत झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. प्रीतम यांची आई जीव वाचवण्यासाठी कित्येक दिवस एका विहीरीत लपून राहिली होती आणि शेवटपर्यंत बाहेर येऊ शकली नाही. भूक, तहानेमुळे त्या विहीरीतच त्यांचा मृत्यू झाला. प्रीतम एकटेच राहिले. 5 दिवसात दुसरी घटना; धर्म परिवर्तनासाठी दबाव, तरुणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी पंजाबमधल्या लुधियाना जिल्ह्यातील पूत गावांत सध्या प्रीतम खान राहतात. प्रीतम खान यांच्या पुतण्याची YouTuber नासिर यांच्याशी भेट झाली. फाळणीच्या वेळेस ताटातूट झालेले आपले काका म्हणजे प्रीतम खान आणि आजी म्हणजे प्रीतम खान यांना आपण शोधत असल्याचं पुतण्यानं नासिर यांना सांगितलं. त्यानंतर नासिर यांनी सोशल मीड्यावर एक व्हिडिओ अपलोड केला. या माध्यमातून प्रीतम यांचा शोध लागला. फाळणीच्या वेळेस अशी लाखो कुटुंबांची ताटातूट झाली. शेवटपर्यंत त्यांची भेट होऊ शकली नाही. प्रीतम खान यांचे वडील आणि भावांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांची आणि प्रीतम खान यांची भेट होऊ शकणार नाही. पण आपल्या आयुष्याच्या शेवटी आपण कुटुंबातील अन्य सदस्यांबरोबर राहावं आणि तिथेच आपल्याला मृत्यू यावा अशी प्रीतम खान यांना वाटतं. प्रीतम खान यांची त्यांच्या नातेवाईकांशी भेट व्हावी यासाठी त्यांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी लागेल. पाकिस्तानात जाण्याचा व्हिसा प्रीतम खान यांना मिळावा यासाठी YouTuber नासिर खान यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयात निवेदनही दिलं आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी आपला जन्म झाला तिथेच आपण अंतिम श्वास घ्यावा असं त्याला वाटत असतं. फाळणीच्या वेळेस तर कितीतरी जणांना आपली जन्मभूमी सोडून दुसरीकडे बस्तान बसवावं लागलं. त्यांचं आयुष्य तर पुढे सरकलं पण मनात जुन्या आठवणी तशाच राहिल्या. त्यामुळेच आजही प्रीतम खान यांच्यासारखे अनेकजण आपल्या जन्मभूमीच्या अंतिम दर्शनासाठी तरसत आहेत. त्यांची ही इच्छा पूर्ण होवो.
    First published:

    Tags: Pakistan, Pakistan love

    पुढील बातम्या