पाटना, 27 मे : पाटनामधील (Bihar News) 11 वर्षीय राहुल ( नाव बदललेलं आहे) आपल्या शाळेच्या बॅगेमुळे वैतागला होता. सकाळी-सायंकाळी 8 ते 9 किलोची बॅग घेऊन शाळेत येता-जाताना त्याला खूप त्रास होत होता. दोन महिन्यांपूर्वी बॅगेच्या वजनामुळे त्याची मान दुखी लागली होती. यानंतर तो यूट्यूबवर योग अभ्यासाचे व्हिडीओ पाहून तो त्यावर उपचार करीत होता. मुलाने सलग 15 दिवस कोणाच्या देखरेखीशिवाय शीर्षासन आणि अन्य व्यायाम केला. मात्र यात त्याची मान पूर्णपणे वाकडी झाली.
पुष्पा चित्रपटातील पुष्पा राजप्रमाणे वाकडी झालेली मान पाहून घरातले घाबरले. यानंतर शाळेपासून ते आजूबाजूचे लोक मुलाला झुकेगा नही म्हणून चिडवू लागले. यानंतर मुलाने दीड महिने उपचार घेतला. त्यानंतर कुठे जाऊन त्याची मान जाग्यावर आली. या प्रकरणात डॉक्टरांनी सांगितलं की, सध्या यूट्यूबवर व्हिडीओ पाहून उपचार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.
डॉक्टरांनी सांगितलं की, यूट्यूब आणि अन्य माध्यमातून व्हिडीओ पाहून लोक स्वत:वर उपचार करीत आहेत. यापूर्वी यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने कंबरदुखीसाठी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून व्यायाम करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर विद्यार्थ्याचा त्रास इतका वाढला की, त्याला परीक्षाही देता आली नाही. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, लॉकडाऊन आणि ऑनलाइन शिक्षन सुरू झाल्यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाइल आला आहे. यामुळे त्यासंबंधित मान आणि कंबरदुखीच्या समस्या सुरू झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.