Home /News /national /

Coronavirus : या राज्याने महाराष्ट्रातून आलेल्या व्यक्तींसाठी केला वेगळा नियम

Coronavirus : या राज्याने महाराष्ट्रातून आलेल्या व्यक्तींसाठी केला वेगळा नियम

महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान 7 दिवस कुणाच्याही घरी किंवा कामावर जाता येणार नाही. संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे.

  बंगळुरू, 15 जून : Coronavirus चा प्रकोप देशभरात सुरूच आहे. त्यातही महाराष्ट्रात आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. देशात असलेल्या रुग्णसंख्येच्या निम्मे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे Lockdown आणि Unlock चे नियम आता देशभर सारखे राहिलेले नाहीत. प्रत्येक राज्याने आपापल्या क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वेगेवेगळे नियम लागू केले आहेत. कर्नाटकात कुठल्याही इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांना थेट घरी जाऊ दिलं जात नाही. काही ठराविक शहरांमधून किंवा राज्यांमधून आलेल्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक आहे. चेन्नई आणि दिल्लीतून आलेल्या प्रवाशांना 3 दिवस संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये राहणं आणि त्यानंतर 11 दिवस होम क्वारंटाइन राहणं आवश्यक करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मात्र किमान 7 दिवसांचं संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यापुढचे 7 दिवस घरात क्वारंटाइन राहणंही आवश्यक असल्याचं कर्नाटकने स्पष्ट केलं आहे. कर्नाटकात Coronavirus चा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीला हा संसर्ग कुठून झाला हे तपासण्यात येत आहे. त्यानुसार पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातल्या इतरांवरही सरकार लक्ष ठेवत आहे. नियमाप्रमाणे चाचण्या करण्यात येत आहे.

  वाचा - आता फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान; अँटिजेन टेस्ट किटने होणार चाचणी

  प्रत्येक व्यक्तीमागे 49 व्यक्तींचं काँटॅक्ट ट्रेसिंग केलं जातं. आतापर्यंत कर्नाटकात Covid-19 ची साथ आटोक्यात ठेवण्यात यश आलं आहे. पण तरीही बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसात मिळालेल्या कोरोना रुग्णांमध्ये काँटॅक्ट ट्रेसिंग होऊ शकलेलं नाही. कुणाच्या संपर्कात आल्याने विषाणूची लागण झाली हे न समजल्याने आता नियम कडक करण्यात आले आहेत. कर्नाटकात आतापर्यंत उघड झालेल्या 7000 कोरोना रुग्णांपैकी 386 महाराष्ट्रातून आलेले आहेत. इतर 1340 जणांना महाराष्ट्रातून आलेल्या संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. इतर कुठल्याही एका राज्यातून झालेल्या संसर्गापेक्षा महाराष्ट्रातून जास्त संसर्ग पसरल्याचं कर्नाटकने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतं. त्यामुळे महाराष्ट्रापुरते तिथे वेगळे कडक नियम क्वारंटाइनसाठी लावण्यात आले आहेत. कर्नाटकात स्पष्ट झालेला कोरोना संसर्ग परदेशातून आलेले 216 महाराष्ट्र 386 + 1340 दिल्ली 87 तमीळनाडू 67 गुजरात 62

  अन्य बातम्या

  डिप्रेशन नाही तर 'या' कारणामुळे सुशांतनं केली आत्महत्या? नवी माहिती आली समोर

  शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

  कोरोनाकाळात मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा असा पार पडला विवाह; पाहा PHOTO

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Coronavirus, Karnataka

  पुढील बातम्या