मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आता फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान; अँटिजेन टेस्ट किटने होणार चाचणी

आता फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान; अँटिजेन टेस्ट किटने होणार चाचणी

ICMR ने कोरोना चाचणीसाठी अँटिजेन डिटेक्शन टेस्टला (Antigen Detection Test) मंजुरी दिली आहे.

ICMR ने कोरोना चाचणीसाठी अँटिजेन डिटेक्शन टेस्टला (Antigen Detection Test) मंजुरी दिली आहे.

ICMR ने कोरोना चाचणीसाठी अँटिजेन डिटेक्शन टेस्टला (Antigen Detection Test) मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली, 15 जून : आतापर्यंत कोरोनाव्हायरसची चाचणी (coronavirus test) करण्यासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट केली जात होती. ज्या चाचणीचा रिपोर्ट यायला खूप वेळ लागत होता. मात्र आता कोरोनाची चाचणी करण्यासाठी अँटिजेन टेस्ट किट (antigen test kit) वापरलं जाणार आहे. ज्यामुळे अवघ्या 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार आहे.

इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्च (ICMR) आणि एम्सने AIIMS  कोरोना चाचणीसाठी अँटिजेन डिटेक्शन टेस्टला (Antigen Detection Test) मंजुरी दिली आहे. या टेस्टमध्ये जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर ती कोरोना पॉझिटिव्ह मानली जाईल. त्या व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट होणार नाही. मात्र जर या टेस्टमध्ये एखादी व्यक्ती कोरोना नेगेटिव्ह असेल तर आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल, असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

हे वाचा - 21 जूनला 'या' कारणामुळे ठीक होणार कोरोना? चेन्नईच्या शास्त्रज्ञाचा अजब दावा

आयसीएमआरचे शास्त्रज्ञ डॉ. एलके शर्मा म्हणाले, "अँटिजेन टेस्टवर पॉझिटिव्ह आलेले रिझल्ट पॉझिटिव्ह मानले जातील, पडताळणीसाठी पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. यामध्येच व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही ते समजेल"

कशी केली जाणार अँटिजेन चाचणी

अँटिजेन टेस्ट किट होम प्रेग्नन्सी किटप्रमाणेच आहे. ही टेस्ट करण्यासाठी फक्त नसल स्वॅब (nasal swab) घेतले जातील आणि टेस्ट किटच्या मार्फत चाचणी केली जाईल. टेस्ट स्ट्रिप्सवर येणाऱ्या कंट्रोल लाइननुसार कोरोना पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह याचं निदान होईल.

भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या

देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची 332,424 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहापर्यंत 24 तासांत 11502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 169798 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 9520 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - 'या' देशाच्या लसीचं ट्रायल यशस्वी, 14 दिवसांत टळू शकतो मृत्यूचा धोका

First published:
top videos

    Tags: Coronavirus