शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

ऑनलाइन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शालेय शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे

  • Share this:

मुंबई, 15 जून : राज्यात कोरोनाची परिस्थितीत शाळा सुरू करावी की नाही, याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर याबद्दल आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.

ऑनलाइन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शालेय शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे.

असे असता का राजकीय पुढारी? पुण्यात घडली अत्यंत लाजीरवाणी घटना VIDEO

तसंच, ज्या भागात कोरोनाचा परिस्थिती आटोक्यात आली असेल अशा भागाची वेगळी विभागणी करण्यात येणार आहे. अशा भागात पुरेशी काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या  ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाचे सचिव इतर अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणी माणसाचा नादखुळा, वापरत आहे चक्क चांदीचा मास्क!

सुरू करण्याचे नियोजन

रेड झोन मध्ये नसलेल्या 9 , 10,12  वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्ट पासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या  मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरू करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 संपादन - सचिन साळवे

First published: June 15, 2020, 3:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading