मुंबई, 15 जून : अभिनेत सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput ) याच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. अद्याप पोलिसांनी आत्महत्येचं कारण सांगितलं नसलं तरी, पोस्टमार्टम रिपोर्टमधून श्वास गुदमरून झाल्याचं समोर आलं आहे. याचाच अर्थ सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांत गेले पाच महिने नैराश्यात होता. पाच दिवसांपूर्वी सुशांतच्या बहिणीनं त्याच्याशी फोनवरून बातचित केली. तेव्हा सुशांतनं तब्येत ठिक नसल्याचं सांगितलं. त्यानंतर काही दिवस त्याची बहिण वांद्रे येथील त्याच्या घरी राहायला होती.
दरम्यान, आता सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण फक्त डिप्रेशन नाही तर प्रेम प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. सुशांत गेले काही महिने डिप्रेशनवरील औषधं घेत नव्हता. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी रात्री सुशांतने दोन जणांना फोन केला होता. यात त्याची गर्लफ्रेंण्ड मानली जाणारी रिया चक्रवर्ती आणि पवित्रा रिश्तामधील अभिनेता महेश शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र या दोघांनीही फोन उचलला नाही. त्यानंतर रविवारी दुपारी 12 वाजता महेश शेट्टीनं सुशांतला पुन्हा फोन लावला, मात्र तोपर्यंत सुशांतचा मृत्यू झाला होता.
वाचा-सुशांतच्या आत्महत्येचं कारण आर्थिक परिस्थिती नाही, बहिणीनं केला मोठा खुलासा
रियासोबत होणार होतं लग्न?
सुशांतच्या जवळच्या मित्रानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुशांतनं काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांशी फोनवरून चर्चा केली होती. सुशांतनं नोव्हेंबरमध्ये लग्न करण्याचे मान्य केले होते. सुशांत आणि रिया यांचे लग्न होणार होते, मात्र लग्नावरून या दोघांमध्ये मतभेद होते. लॉकडाऊनमध्ये रिया सुशांतच्या घरी होती, मात्र त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीच्या घरी शिफ्ट झाली. रिया-सुशांत यांच्या दुरावा आल्याचेही बोलले जात आहे. सुशांतनं या काळात अनेक वेळा रियाला फोन केला, मात्र तिनं फोन उचलला नाही. यामुळं सुशांत नाराज आणि रागात होता. यातून त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलीस रियाची चौकशी करणार आहेत.
वाचा-सिनेमात ज्या मुलाला मरणातून वाचवलं, त्यानेच सुशांतसाठी लिहिली इमोशनल पोस्ट
कोण आहे रिया चक्रवर्ती?
मागच्या काही दिवसांपासून रिया आणि सुशांत हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे आता रियाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. मात्र सुशांतच्या निधनावर रियाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखातीत रियानं यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली होती. सुशांत आपला बॉयफ्रेंड नाही तर एक चांगला मित्र आहे असं रियानं एका मुलाखतीत म्हटलं होतं. रिया म्हणाली, आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं ओळखतो आणि आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतं. त्यामुळे आमच्यात चांगलं बॉन्डिंग आहे.
वाचा-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नवी अपडेट, 'या' 8 लोकांची होणार चौकशी
संपादन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput