जाहिरात
मराठी बातम्या / देश / गोव्याचा धोका वाढला; कोरोनामुक्त राज्यात मुंबईहून गेलेल्या प्रवाशांमुळे रुग्णसंख्या वाढली

गोव्याचा धोका वाढला; कोरोनामुक्त राज्यात मुंबईहून गेलेल्या प्रवाशांमुळे रुग्णसंख्या वाढली

गोव्याचा धोका वाढला; कोरोनामुक्त राज्यात मुंबईहून गेलेल्या प्रवाशांमुळे रुग्णसंख्या वाढली

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सलग 39 दिवस एकही कोरोनारुग्ण न सापडलेल्या गोवा राज्यात आंतरराज्य वाहतूक सुरू होताच कोरोनारुग्ण सापडले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

राधिका रामस्वामी गोवा, 13 मे : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सलग 39 दिवस एकही कोरोनारुग्ण न सापडलेल्या गोवा राज्यात आंतरराज्य वाहतूक सुरू होताच कोरोनारुग्ण सापडले आहेत. गोव्यात काल 7 कोरोनारुग्णांचं निदान झालं आणि आज त्यात आणखी एकाची भर पडली. हे सगळे रुग्ण गोव्याबाहेरून मुख्यतः मुंबईतून गोव्यात गेलेले आहेत. कोरोनामुक्त राज्य म्हणून मान मिळवणाऱ्या गोव्यात पुन्हा एकदा Coronavirus ने प्रवेश केला आहे. गोव्यात आठवा रुग्ण गुरुवारी सापडला. मुंबईहून प्रवास करून आलेला हा खलाशी असल्याचं समजतं. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचे नवे 8 रुग्ण गोव्यात सापडले आहेत. हे सगळे रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरामधून आलेले आहेत. दक्षिणेतलं एकमेव कोरोनामुक्त राज्य पुन्हा एकदा विषाणूच्या कचाट्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आता आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्याने रुग्णवाढ होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे. देशात गाजणारं मराठवाड्यातलं COVID-19 वैजापूर मॉडेल आहे तरी काय? ग्रीन झोन ची मान्यता मिळालेल्या गोव्यात covid-19 चे अचानक सात नवे रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यात आज एकाची भर पडली. या रुग्णांपैकी एक रुग्ण गुजरातहून माल घेऊन ट्रकमधून आला होता. तो त्या ट्रकचा चालक आहे. मुंबईहून आलेल्या पाच जणांचं कुटुंबही पॉझिटिव्ह सापडलं आहे. या पाच जणांना घेऊन येणाऱ्या गाडीचा चालकही पॉझिटिव्ह सापडला. मुंबईला जाऊन आलेला एक खलाशी पॉझिटिव्ह सापडल्याने गोव्यात आता 8 रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. ‘रॉकस्टार आरोग्यमंत्री’; परदेशी मीडियामध्ये केरळच्या मंत्र्यांची तुफान चर्चा तीन एप्रिल पासून गेले 39 दिवस एकही रुग्ण पॉझिटिव्ह न सापडलेल्या गोव्यात दिलासादायक चित्र होतं. मात्र आता 8 रुग्ण आहेत. त्यांच्यावर मडगावच्या कोवीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ग्रीन झोनची मान्यता मिळाल्यानंतर राज्यअंतर्गत अनेक सुविधांच्या बाबतीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आली होता. मात्र आज नव्यानं आज रुग्ण सापडल्याने लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येत आहे. लॉकडाऊन 3 अंतर्गतचे नियम आता राज्यात लागू होणार आहेत. पुणे पोलिसांचा VIDEO VIRAL, दोघांना अमानुष मारहाण केल्यामुळे नागिरक संतापले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात