मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाला दूर ठेवणारं मराठवाड्यातलं शहर देशात गाजतंय; काय आहे COVID-19 वैजापूर मॉडेल?

कोरोनाला दूर ठेवणारं मराठवाड्यातलं शहर देशात गाजतंय; काय आहे COVID-19 वैजापूर मॉडेल?

वैजापूर शहर आणि तालुक्यात दोन दिवसांपूर्वीपर्यंत एकही कोरोनारुग्णाची नोंद झालेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस धोका वाढत असताना या शहरानं कसा दूर ठेवला हा धोका?

वैजापूर शहर आणि तालुक्यात दोन दिवसांपूर्वीपर्यंत एकही कोरोनारुग्णाची नोंद झालेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस धोका वाढत असताना या शहरानं कसा दूर ठेवला हा धोका?

वैजापूर शहर आणि तालुक्यात दोन दिवसांपूर्वीपर्यंत एकही कोरोनारुग्णाची नोंद झालेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस धोका वाढत असताना या शहरानं कसा दूर ठेवला हा धोका?

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
मुंबई, 14 मे : महाराष्ट्रात Coronavirus चा प्रादुर्भाव कमी व्हायचं नाव घेत नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढत आहे. औरंगाबाद जिल्हा सुरुवातीला सुरक्षित वाटत असतानाच अचानक भराभर या जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले. आता मुंबई, पुण्यानंतर सर्वाधिक धोका औरंगाबादमध्ये असल्याचं सांगण्यात येतं. पण असं असूनही याच जिल्ह्यातला एक भाग पूर्णपणे कोरोनामुक्त आहे आणि याचं श्रेय या शहरातल्या प्रशासनाबरोबरच नागरिकांना, स्वयंस्फूर्तीने कोरोना योद्ध्यांना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जातं. ही गोष्ट आहे वैजापूरची. मराठवाड्यातलं वैजापूर हे मध्यम आकारचं शहर. आता कोरोनाला दूर ठेवण्याचा हा वैजापूर फॉर्म्युला देशभर चर्चेत आला आहे. मुंबई पुण्यातही वैजापूकचं हे मॉडेल उपयुक्त ठरू शकतं का याची चाचपणी सुरू झाली आहे. मराठवाड्यातलं वैजापूर हे 60,000 लोकसंख्येचं छोटं शहर. हे शहर आणि आसपासची 218 गावं यामध्ये एकही कोरोना रुग्ण अद्याप आढळलेला नाही. वास्तविक मराठवाड्याचं प्रवेशद्वार असं वैजापूरला म्हटलं जातं. मुंबईतून उत्तर महाराष्ट्र किंवा पुढे जाण्यासाठी याच शहरातून मार्ग जातो. अनेक स्थलांतरित मजूर इथूनच प्रवास करत पुढे जातात. वाचा - धक्कादायक! या एका निर्णयामुळे अख्ख्या कोकणात कोरोना पसरण्याची भीती त्यामुळे शहराला कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहेच. पण औरंगाबाद जिल्ह्यात 11 मे पर्यंत 602 कोरोनारुग्ण सापडले आणि 14 मृत्यू नोंदले गेले, तरी वैजापूर सुरक्षित राहिले. काय आहे वैजापूर मॉडेल? वैजापूरकरांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊनचं निष्ठेनं पालन केलं. कडेकोट बंद पाळला. त्याच्या बंदोबस्तासाठी कोरोना योद्ध्यांवर ताण येऊ दिला नाही. उलट डॉक्टर, रुग्णालयं, पोलीस या कोरोना योद्ध्यांना बळ देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने मदत देऊ केली. कोरोना योद्ध्यांनाही दिला आराम सर्व कोरोना योद्ध्यांना गावकऱ्यांच्या निधीतून PPE किट, सॅनिटायझर याचं वाटप करण्यात आलं. कोरोनायोद्ध्यांवर अतिकामााचा ताण आहे, हे लक्षात येताच गावातल्या काही स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेऊन स्वयंसेवक तयार केले आणि दोन दिवस सरकारी सेवकांना विश्रांतीसाठी मोकळं केलं. 80 स्वयंसेवकांनी तालुक्यातली 8 ठाणी दोन दिवसांसाठी सांभाळली आणि तिथल्या पोलीस कॉन्सेटबल्सना आराम मिळाला. वाचा - श्रमिक ट्रेनमध्ये सापडले 3 कोरोना संशयित, बुधवारी 4 प्रवाशांना केलं होतं आयसोलेट तीच गोष्ट सरकारी डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची. त्यांचं काम अविरत सुरू असलेलं पाहून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली सेवा देऊ केली. एका सरकारी डॉक्टरच्या देखरेखीखाली अशा स्वयंसेवी आरोग्यसेवकांनी दोन दिवस काम पाहिलं आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरचा ताण हलका केला. सहा प्राथमिक आरोग्य केंद्र खासगी डॉक्टरांनी चालवली आणि सरकारी डॉक्टरांना आवश्यक विश्रांती मिळाली. 3000 Whatsapp ग्रूपवर प्लॅनिंग हा सगळा व्यवहार सांभाळण्यासाठी, इमर्जन्सी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास 3000 Whatsapp ग्रूप कार्यरत आहेत. हा लोकसहभागातून सुरू झालेल्या मॉडेलमध्ये स्थानिक प्रशासनाचा मोठा वाटा आहे. तसंच स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांनी मदत करून लोकांना सहभागी करून घेतलं आणि स्वयंसेवक तयार केले. वाचा - लॉकडाऊनमध्ये अनोखा विवाहसोहळा; कोरोना योद्ध्यांच्या साक्षीने बांधली लग्नगाठ फक्त सरकारला दोष न देता आणि सरकारी मदतीवर अवलंबून न राहता इथल्या नागरिकांनी सरकारबरोबर सहकार्य करत दोन पावलं पुढे येऊन स्वतः मदत केली. त्यामुळे वैजापूर अद्याप कोरोनाला दूर ठेवण्यात यशस्वी झालं आहे. (ORF मध्ये सायली माणकीकर यांनी लिहिलेल्या आणि News18.com वर प्रसिद्ध झालेल्या अभ्यासलेखावर आधारित) 'या' 10 राज्यांनी वाढवली सरकारची चिंता, असा आहे महाराष्ट्रातील रुग्णांचा ग्राफ
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या