नवी दिल्ली, 14 मे : कोरोना व्हायरसशी (Coronavirus) दोन हात करण्यासाठी केरळच्या आरोग्य मंत्र्यांची (Heath Minster) चर्चा परदेशी मीडियामध्ये सुरू आहे. यापूर्वीही कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी केके शैलजा (K.K.Shailja) यांचं कौतुक केलं जात होतं. आता ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’मध्ये त्यांच्याबाबतचा लेख छापून आल्यानंतर त्या रॉकस्टार झाल्या आहेत. यामध्ये केके शैलजा यांनी कोरोनाशी दोन हात करण्याबरोबरच अनेक विषयांवर चर्चा केली आहे. पहिला रुग्ण येण्यापूर्वीच सुरू होती तयारी भारतात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 31 जानेवारी रोजी समोर आला होता. 11 दिवसांपूर्वी केरळचे आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी वुहानमध्ये प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसबाबत माहिती जमा करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपल्या एक सहयोगीला हा व्हायरस भारतात येण्याची शक्यता विचारली होती. त्यावर ‘हो’ उत्तर आल्यानंतर त्यांनी कोरोना विरोधात तयारी सुरू केली. ठीक 11 दिवसांनंतर या व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये समोर आला. या घटनेला 4 महिने पूर्ण होणार आहेत. साडे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाचे केवळ 524 रुग्ण आहेत आणि 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कम्युनिटी ट्रान्समिशनचे रुग्ण समोर आलेले नाहीत. मार्च महिन्यात केरळमध्ये सर्वाधित रुग्ण होते, मात्र त्यानंतर यावर नियंत्रण आणण्यात आलं आहे. 63 वर्षांच्या केके शैलजा या व्यवसायाने शिक्षिका असून त्यांना रॉकस्टार आरोग्य मंत्री म्हटले जात आहे. कसं आणलं नियंत्रण आपल्या सहकाऱ्याशी बातचीत केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 जानेवारी रोजी केके शैलजा यांवी कोरोनाबाबत रॅपिड रिस्पॉन्स टीमसह बैठक घेतली. दुसऱ्याच दिवशी ही टीम आपल्या कंट्रोल रुममध्ये बसूव काज्यातील सर्व जिल्ह्यातील मेडिकल ऑफिसर्सतर्फे तयारी सुरू केली. 27 जानेवारी रोजी केरळमध्ये कोरोना संशयित सापडला होता. चीनमधील वुहानहून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यामध्ये जास्त ताप होता. बाकीच्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. कोविड-19 चे पत्रक छापून लोकांमध्ये वाटण्यात आले. तोपर्यंत रुग्णालयात दाखल केलेले संशयित रुग्ण बाधित झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर देशभरात हा आजार पसरला होता, असं शैलजा सांगतात. फेब्रुवारी आव्हानात्मक होता, कारण त्यावेळी इटलीहून परतलेल्या एका कुटुंबीयांने आपल्या ट्रॅव्हल हिस्ट्री लपवली. त्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा तपास सुरू केला. केरळमध्ये जेव्हा रुग्णांची संख्या वाढली तेव्हा राज्यात तब्बल 1 लाख 70 हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. यांच्यावर लक्ष ठेवले जात असल्याचे शैलजा यांनी सांगितले. शैलजा यांनी सांगितल्यानुसार राज्यात कम्युनिटी किचनमुळे 1.5 लाख अप्रवासी मजुरांना रोज अन्न दिलं जात होतं. दिवसातून तीन वेळा त्यांना जेवण दिलं जात होतं. यापूर्वी निपाह व्हायरस नियंत्रित करण्यासाठीही केके शैलजा यांनी कडक उपाययोजना केल्या होत्या. केरळने 2018 मध्ये पसरलेल्या निपाह व्हायरसविरोधातही लढा दिला होता. त्यावेळी ग्रामीण भागात लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, मात्र योग्य नियमावली व उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करीत निपाहवर नियंत्रण आणणे शक्य झाल्याचं शैलजा म्हणाल्या. संबंधित - कोरोनामुळे कामाच्या पद्धतीत मोठे बदल; मंत्रालयांकडून WFH च्या गाईडलाईन्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.