मराठी बातम्या /बातम्या /देश /गॅस महागणार? हनुमान जन्मस्थळाचा वाद मिटणार? समीर वानखेडेंची उचलबांगडी TOP बातम्या

गॅस महागणार? हनुमान जन्मस्थळाचा वाद मिटणार? समीर वानखेडेंची उचलबांगडी TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

मुंबई, 31 मे : हनुमान जन्मस्थळ अंजनेरीवरून सुरू झालेला वाद आता धर्म परिषदेसमोर ठेवला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमती 1 जूनपासून वाढण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासह राज्यासह देशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा.

हनुमान जन्मस्थळ वाद धर्म परिषदेसमोर

हनुमान जन्मस्थळ अंजनेरीवरून सुरू झालेला वाद आता धर्म परिषदेसमोर ठेवला जाणार आहे. किश्किंधा कर्नाटकहून आलेले सागरानंद सरस्वती यांच्या दाव्यावर नाशिक आणि महाराष्ट्रातील साधू महंत आपली बाजू मांडून नाशिक अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे पुरावे सादर करणार आहे. या धर्मपरिषदेत वाद होणार की संघर्ष होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

अहमदनगर येथे 31 मे ला अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर उपस्थिती राहणार आहे.

अविनाश भोसले यांच्या कोठडीवर निर्णय

उद्योगपती अविनाश भोसले यांना CBI कोठडी की न्यायालयीन कोठडी 11 वाजता मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे.

समीर वानखेडेंची अखेर महाराष्ट्राबाहेर बदली

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात तोंडघशी पडलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आता मोठा दणका देण्यात आला आहे. अखेरीस समीर वानखेडे यांची मुंबईतील सुट्टी करण्यात आली आहे. त्यांची बदली आता चैन्नईला करण्यात आली आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

घरगुती सिलेंडरच्या किमती 1 जूनपासून वाढण्याचा अंदाज

महागाईमुळे (Inflation) आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांची धाकधूक आणखी वाढली आहे. कारण 1 जून रोजी देशात LPGच्या किमती पुन्हा वाढू शकतात. गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दर निश्चित करतात. यावेळी घरगुती एलपीजीची (LPG Cylinder) किंमत 1100 रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

रुपाली चाकणकर यांना फोनवरून धमकी

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन (threatened call) करून चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईतील बंगल्यावर याआधी मुंबई पालिकेनं कारवाई केली होती. आता मुंबई महापालिकेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

सर्व विद्यापीठांच्या परीक्षांबाबत हाय कोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश

गेल्या काही महिन्यांमध्ये कॉलेजेसही ऑफलाईन (Offline Colleges in Maharashtra) पद्धतीनं सुरु झाले आहेत. मात्र गेली दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेतल्यामुळे ऑफलाईन परीक्षेला (Offline exams in Maharashtra) विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन (Offline exams in All universities in Maharashtra) पद्धतीनं घेण्यात येणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

ज्ञानवापी मशिदीमधला शिवलिंगाचा VIDEO आला समोर

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Mosque) शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. पण आता या शिवलिंगाजवळ असलेल्या भिंतीवर त्रिशुळाचे नक्षीकाम केले असल्याचे चिन्ह आढळून आले आहे. ज्ञानवापी मशिदीमधला व्हिडीओ आता समोर आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

First published:

Tags: Hanuman, Top news india, Top news maharashtra