मुंबई, 30 मे : महागाईमुळे (Inflation) आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांची धाकधूक आणखी वाढली आहे. आहे. कारण 1 जून रोजी देशात LPGच्या किमती पुन्हा वाढू शकतात. गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दर निश्चित करतात. यावेळी घरगुती एलपीजीची (LPG Cylinder) किंमत 1100 रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही 1 तारखेपूर्वी गॅस बुक करून काही बचत करू शकता. सध्या मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची (LPG Cylinder Price) किंमत 1002.5 रुपये, दिल्लीत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1058 रुपये आहे. मे महिन्यात दोनदा भाव वाढ गॅस कंपन्यांनी मे महिन्यात घरगुती एलपीजीच्या दरात दोनदा वाढ केली होती. पहिला दर 7 मे रोजी वाढवण्यात आला होता. या दिवशी 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा 3.5 रुपयांनी वाढ करण्यात आली. म्हणजेच महिन्यात एलपीजीवर एकूण 53.5 रुपयांची वाढ करण्यात आली. जागतिक बाजारपेठेतील गॅसच्या किमती पाहता 1 जून रोजी पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. Post Office च्या’ या’ तीन योजनांमध्ये पैसे गुंतवा आणि जमवा मोठी रक्कम व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. दिल्लीत त्याची किंमत 102 रुपयांनी वाढली आहे. यानंतर राजधानीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2355.5 रुपये झाली. त्याच वेळी, 5 किलोच्या लहान एलपीजी सिलेंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे. गॅसची किंमत कशी ठरवली जाते? भारतातील बहुतेक गॅस पुरवठा आयातीवर आधारित असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार IPP देखील निर्धारित केला जातो. भारतातील LPG चे बेंचमार्क सौदी अरमकोंची LPG किंमत आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी एलपीजीची विक्री किती किंमतीला करते, या आधारावर देशांतर्गत बाजारात त्याची किंमत ठरवली जाते. एलपीजीची किंमत ही केवळ गॅसची किंमत नाही. यामध्ये कस्टम ड्युटी, वाहतूक आणि विमा यासारख्या इतर घटकांचा समावेश आहे. Online व्यवहार करताय? मग Cyber Insurance विषयी माहितीच पाहिजे किमती वाढण्याचे कारण प्रमुख कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची वाढलेली किंमत आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होणे हे एक कारण आहे. वास्तविक, ही खरेदी आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरवर होते आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे भारताला जास्त किंमत मोजावी लागते. याशिवाय सध्या गॅसचा पुरवठा त्याची मागणी पूर्ण करू शकत नाही. गॅसच्या किमती वाढण्यामागे हेही एक कारण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.